अमृता देशमुखवर कोसळला दुखा:चा डोंगर, अतिशय जवळच्या व्यक्तीचे झाले निधन
‘बिग बॉस मराठी ४’ च्या माध्यमातून प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख प्रकाशझोतात आले होते. या कपलने २०२३ मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये लग्नगाठ बांधली. हे कपल कायमच इन्स्टाग्रामवर चर्चेत रहातं. अभिनेत्री अमृता देशमुखने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना दु:खद बातमी दिली आहे. तिच्या आजोबांचे निधन झाल्याची माहिती अभिनेत्रीने स्वत: इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिले आहे.
हे देखील वाचा – संघर्षमय प्रेमाची नादमय कथा; ‘नाद – द हार्ड लव्ह’ चा अॅक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते, “मागच्या वर्षी 2 सप्टेंबर ला माझ्या आजोबांनी (आईचे बाबा- वसंत पोतनीस) सळसळत्या उत्साहात प्रसाद आणि माझं केळवण केलं होतं..आणि अगदी मंगळागौरीला सुद्धा भरपूर गिफ्ट आणि आशीर्वाद घेऊन आले होते..आज दुपारी आजोबा देवाघरी गेले..वय 87 ! आम्हाला कुणालाच सवयच नाहीये आजोबा आणि त्यांचा उत्साह, त्यांचे whatsapp वरचे msgs नसण्याची..आजोबा तुम्हाला आणि तुमच्यातल्या positivity ला खूप miss करू..”
अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून, तिच्या सेलिब्रिटी मित्रांकडून आणि फॅमिली सदस्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. अमृताच्या आजोबांच्या निधनाचे वृत्त ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून प्रसाद आणि अमृता घराघरांत पोहोचले. जुलै महिन्यात प्रसाद आणि अमृताने सोशल मीडियावर फोटो शेअर करीत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रसाद आणि अमृताचा शाही विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यात कुटुंबीय, जवळच्या नातेवाइकांबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनीही हजेरी लावली होती.