आदित्य पांचोलीचं खरं नाव काय ? चित्रपटामुळे नाही तर वादामुळेच चर्चेत; वाचा बॉलिवूड प्रवास…
आदित्य बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक वादांसोबत जोडला गेला. त्याच्यावर बलात्कार, मारहाण असे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. या खास प्रसंगी, आदित्य पांचोलीच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.
आदित्य पांचोली बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव, जो त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वादांमुळेच सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. आदित्य 4 जानेवारीला त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. तो केवळ चित्रपटांमध्येच नाही तर टीव्हीच्या दुनियेतीलही एक प्रसिद्ध चेहरा आहे आणि तिथेही त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. आदित्य बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक वादांसोबत जोडला गेला. त्याच्यावर बलात्कार, मारहाण असे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. या खास प्रसंगी, आदित्य पांचोलीच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.
अभिनेता आदित्य पांचोलीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच जरीना वहाबशी लग्न केले. जरीना वहाब आदित्य पांचोलीपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नाही. आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांना सूरज पांचोली आणि सना पांचोली ही दोन मुले आहेत. सूरज पांचोलीने ‘हीरो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अभिनेता आदित्य पांचोलीचे खरे नाव निर्मल पांचोली आहे. आदित्य पांचोलीने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात चित्रपट निर्माता म्हणून केली होती. ‘नारी हिरा’ हा निर्माता म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता.
आदित्य पांचोलीचे नाव बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतसोबत जोडले गेले होते. आदित्य पांचोली तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कंगनाचा मेंटर होता. दोघांमध्ये अनेकदा मारामारीही झाली होती. कंगना रणौतने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘ते दोघे पती-पत्नीसारख्या नात्यात होते. दोघेही यारी रोडवर स्वत:साठी घराचे नियोजन करत होते. मित्राच्या घरीही ते तीन वर्षे एकत्र राहत होते. कंगनाने सांगितले की, ती वापरत असलेला फोनही आदित्य पांचोलीचा होता. नंतर अभिनेत्याने कंगनावर खोटे आरोप केल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली.
एवढेच नाही तर 2011 मध्ये आदित्य पांचोलीचे फ्लाइटमध्ये क्रू मेंबर आणि को-पायलटसोबत भांडण झाले होते. प्रकरण खराब हवामानाच्या घोषणेचे होते. आदित्यने क्रू मेंबरला धक्काबुक्की केली होती. बाकी क्रू मेंबर्सनीही त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आदित्य पांचोली गोंधळला. आदित्य पांचोली देखील 2015 मध्ये एका पब हल्ल्याच्या प्रकरणात अडकला होता. आवडते गाणे वाजले नसल्याने आदित्य पांचोलीने पबमध्ये डीजेसोबत मारामारी केली होती. रागाच्या भरात त्याने गार्डवर फोन मारला आणि याप्रकरणी त्याला अटकही झाली.
Web Title: Bollywood actor aditya pancholi birthday special know actor controversies and unknown facts about his life