तापसी पन्नू आहे 'ब्युटी विथ ब्रेन' 7 वर्षांपूर्वी अभिनेत्रीने स्वतः तयार केले होते 'हे' App
तापसी पन्नूचा आज म्हणजेच १ ऑगस्टला वाढदिवस आहे. तेलुगु चित्रपट ‘झुम्मंडी नादम’ द्वारे फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केलेल्या तापसीने तिच्या करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती अखेरची शाहरुख खानसोबत ‘डंकी’मध्ये दिसली होती. ‘ब्युटी विथ ब्रेन’ ही ओळ तापसीला अगदी शोभते. याचे कारण म्हणजे अभिनयात आपली प्रतिभा दाखवणारी तापसी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तिचे नाव बॉलीवूडमधील सर्वात एज्युकेटेड अभिनेत्रींमध्ये गणले जाते.
तापसीने दिल्लीतून शिक्षण पूर्ण केले होते. तिचे शालेय शिक्षण माता जय कौर पब्लिक स्कूलमधून झाले. त्यानंतर त्यांनी गुरु तेग बहादूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग केले. तापसी जेव्हा इंजिनीअरिंग करत होती तेव्हा ती कॅटची तयारीही करत होती. तिला यात 88 पर्सेंटाइल मिळाले होते.
FontSwap ॲपची वैशिष्ट्ये
सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना तापसीने मोबाइल ॲप तयार केले होते. FontSwap असे या ॲपचे नाव आहे. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या तिच्या दोन मित्रांसह तिने हे ॲप तयार केले. या ॲपद्वारे तुम्ही आयफोनचा फॉन्ट बदलू शकता. FontSwap बद्दल बोलताना ती म्हणाली, “असे अनेक ॲप्स सध्या उपलब्ध आहेत, पण सुमारे 6-7 वर्षांपूर्वी हे अशा प्रकारचे पहिले ॲप होते.” तापसीला हे ॲप ॲप स्टोअरमध्ये सबमिट करता आले नाही. यामागचे कारण सांगताना ती म्हणाली की, ॲपला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया खूप अवघड होती, त्यामुळे ती करू शकली नाही.
चित्रपटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला
यानंतर तिने चित्रपटांच्या चकाचक दुनियेत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. 2008 मध्ये ती ‘गेट गॉर्जियस’ या शोमध्ये दिसली होती. येथूनच तिचे मॉडेल म्हणून करिअर सुरू झाले. यानंतर ती काही टीव्ही जाहिरातींमध्येही दिसली. टीव्ही ते बॉलिवूडचा प्रवास तापसीसाठीही सोपा नव्हता. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिने काही साऊथ चित्रपटांमध्येही काम केले होते.