नववधू अलेखा अडवाणीच्या लाल लेहंग्याने वेधले लक्ष; आधार जैनचा लूक देखील होता हटके, पहा Photos (फोटो सौजन्य - युट्यूब)
या खास दिवशी आधार जैनने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. डोक्यावर सोनेरी रंगाची पगडी आणि गळ्यात हिरव्या रंगाचा मोत्याचा हार घालून नवरदेव खूप छान दिसत होता.
या प्रसंगी, अलेखा अडवाणीने सोनेरी भरतकाम असलेला इतका सुंदर मरून रंगाचा लेहेंगा घातला होता की हा रंग तिला खूप शोभत होता. यासोबतच तिने चोकर नेकलेस आणि गळ्यात एक लांब नेकलेस घातला होता. अलेका यामध्ये सर्वात सुंदर वधूसारखी दिसत होती.
लग्नानंतर दोघेही एकमेकांचे हात धरून मीडियासमोर आले. तसेच अनेक पोझ दिल्या. दोघांच्याही चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत होता. तसेच या दोघांना एकत्र पाहून चाहते देखील खुश झाले.
या लग्नाच्या लूकमध्ये अलेखा आणि आधार खूपच सुंदर दिसत होते. दोघेही एकमेकांमध्ये हरवलेले दिसत होते. तसेच, कॅमेऱ्यासमोर त्यांची अद्भुत केमिस्ट्री दिसत होती.
आधार जैन हा करिश्मा आणि करीना कपूरची मावशी रिमा जैन यांचा मुलगा आहे. या दोघांचा मेहंदीचा सोहळा काही दिवसांपूर्वी झाला. ज्यामध्ये संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र दिसले होते.