Abdu Rozik (फोटो सौजन्य -Instagram)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा सोहळा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. 12 जुलै रोजी दोघांनी शाही पद्धतीने लग्न केले आहे. त्यानंतर १३ जुलै रोजी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी ‘शुभ आशीर्वाद सोहळा’ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोठे गुरू आणि देश-विदेशातील अनेक पाहुणे सहभागी झाले होते.
अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमाला बॉलीवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली आणि या सोहळ्याचा खूप आनंद घेताना ते दिसले आहेत. केवळ सेलिब्रिटीच नाही तर बिग बॉस 16 चे स्पर्धक अब्दू रोजिक देखील ‘शुभ आशीर्वाद सोहळ्याचा’ चा भाग बनले होते. अब्दूला पाहून त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला होता. याचदरम्यान आता त्याने या फंक्शनचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अब्दुने दिले अनंत-राधिकासोबत दमदार पोज
अब्दुने सोशल मीडियावर स्वतः त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर अनंत-राधिकासोबत दमदार पोज देतानाच फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी या फोटोला भरपूर प्रतिसाद देखील दिला आहे. तसेच ही पोस्ट शेअर करून अनंत-राधिका या दोघांसाठी एक सुंदर नोट देखील लिहिली आहे. पहिल्या फोटोमध्ये तो अनंत-राधिकासोबत पोज देताना दिसत आहे. दुसऱ्यामध्ये, त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अब्दूने फंक्शनची झलक दाखवली आहे. तिसऱ्या चित्रात, बिग बॉसचे स्पर्धक अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत पोज देत त्याने अप्रतिम फोटो शेअर केले आहेत.
हा फोटो शेअर करताना अब्दुने लिहिले की, “मी अनंत आणि राधिकाला त्यांच्या आयुष्यभर प्रेम, हशा, शांती, आनंद आणि खूप खूप शुभेच्छा देतो आहे”. असे त्याने या फोटोच्या कॅप्शनला लिहिले आहे. मला असे प्रेम आणि एकता पाहून आदर आणि कृतज्ञता वाटते. या पोस्टला डेव्हिड वॉर्नरने देखील कमेंट केली आहे. क्रिकेटपटूने लिहिले की, “मला देखील आमंत्रण मिळाले असते”. असे लिहून त्यांनी हास्यस्यपद इमोजी शेअर केले आहे.
अब्दु करणार लवकर लग्न
काही काळापूर्वी अब्दू रोझिकने त्याच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्याची एंगेजमेंट झाली आहे ही बातमी भरपूर चर्चेत होती. आणि आता तो लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली आहे. याआधी त्यांचे लग्न ७ जुलैला होणार होते, पण नंतर एका खास कारणामुळे त्यांनी ते काही काळ पुढे ढकलल्याची बातमी समोर आली आहे.