Anant-Radhika (फोटो सौजन्य - Instagram)
देशातील मोठे उद्योकपती मुकेश अंबानी यांचे प्रिय धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी 12 जुलै रोजी राधिका मर्चंटशी लग्न केले, ज्यात देशातील तसेच जगभरातील अनेक मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग काही महिन्यांपूर्वीच सुरू झाले होते. या मोठ्या थाटामाटाच्या लग्नानंतर आता सर्वांना जाणून घ्यायचे आहे की अनंत आणि राधिका त्यांच्या हनीमूनसाठी कुठे जाऊ शकतात? बॉलीवूडलाइफच्या या रिपोर्टमध्ये, अनंत आणि राधिका हे दोघे त्यांच्या हनिमूनसाठी या ७ ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. हे ७ ठिकाण कोणते जाणून घ्या.
अनंत-राधिका या 5 पैकी कोणत्याही एका ठिकाणी हनिमूनसाठी जाऊ शकतात
मिळालेल्या बातमीनुसार, अनंत आणि राधिकाने त्यांच्या हनीमूनसाठी खास योजना आधीच आखल्या आहेत. अनंत आणि राधिका दोघांनाही प्राण्यांची खूप आवड आहे, त्यामुळे असा दावा केला जात आहे की अनंत अंबानी आपल्या पत्नीसोबत हनिमूनसाठी दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्कमध्ये जाऊ शकतो. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला जात आहे की, अनंत आणि राधिका त्यांच्या हनीमूनसाठी स्वित्झर्लंडलाही जाऊ शकतात.
अनंत आणि राधिका शांत ठिकाणी हनिमूनसाठी जाऊ शकतात
तसेच, अनंत आणि राधिका मर्चंट हनीमूनसाठी ब्रिटिश व्हर्जिन आयलंडलाही जाऊ शकतात. हे बेट पोर्तो रिकोच्या पूर्वेला कॅरिबियनमध्ये आहे. या बेटावर अनेक आलिशान हॉटेल्स आणि हनिमून रिसॉर्ट्स आहेत. या यादीत फिजी बेटाच्या नावाचाही समावेश आहे. अनंत आणि राधिका त्यांच्या हनिमूनसाठी फिजी बेट देखील निवडू शकतात. याशिवाय दोघेही हनिमून साजरा करण्यासाठी बोरा-बोरा बेटावरही जाऊ शकतात. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे बालपणीचे मित्र आहेत आणि त्यांच्या प्रेमाची सुरुवात लहानपणापासूनच झाली होती. आकाश अंबानी आणि ईशा अंबानीच्या लग्नात राधिका मर्चंटही उपस्थित होती. आता या दोघांचे लग्न झाले असून, हे दोघे नक्की कुठे हनिमूनसाठी होणार आहेत ते अद्यापही स्पष्ट झाले नाही आहे.