फोटो सौजन्य - Jio Cinema
बिग बॉस १८ : टेलिव्हिजनवरचा लोकप्रिय शो बिग बॉस १८ सध्या प्रचंड चर्चेत आहे. सध्या मागील तीन आठवड्यापासून बिग बॉस १८ चे सदस्य प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आज या शोच्या तिसऱ्या आठवड्याचा विकेंडचा वॉर होणार आहे. यामध्ये बिग बॉसचा होस्ट सलमान खान स्पर्धकांची क्लास घेताना दिसणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये सलमान खानने अरफिन खान आणि त्याची पत्नी सारा अरफिन खानला त्याच्या प्रोफेशनवरून सुनावले होते. तिसऱ्या आठवड्यामध्ये अनेक वाद आणि टास्क बिग बॉसने स्पर्धकांकडून करून घेतले आहेत. यामध्ये त्यांनी अनेकांवर निशाणा साधला होता. अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा यांचा वाद पहिल्या आठवड्यापासून सुरु आहे. त्यामुळे आजच्या आठवड्यामध्ये झालेल्या वादांवर सलमान खान आज स्पर्धकांना आरसा दाखवणार आहे.
बिग बॉस १८ च्या या तिसऱ्या विकेंडच्या वॉरमध्ये आज सलमान खान करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्रा यांच्यावर संतापलेला दिसत आहे. सोशल मीडियावर एक प्रोमो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये सलमान खान करणवीर मेहरा याला सांगत आहे की, तुझ्या लाईफमध्ये दुःख आहे की तू बाहेर सुद्धा कुटूंबाला जोडू शकला नाही आणि इथेही तू फेल झाला आहेस. तू कोणतीही गोष्ट पूर्ण करत नाही, तर करणवीर मेहरा तू जे हे कोपऱ्यामध्ये करत आहेस ते सगळ्यांसमोर कर आणि तू व्हीव्हीएनला सांगत असतो की तुझे चाहते बाहेर बघत आहेत तू शो मध्ये काय करत आहेस? मग तुझे चाहते नाही आहेत का बाहेर तू काय करत आहेस.
As i said yesterday @KaranVeerMehra is playing good than their ladla that’s why @BiggBoss makers are angry of him.
they can’t see anyone who’s playing good then their script.
in this season #KaranVeerMehra is out of syllabus.. #BiggBoss18 #BB18
— 𝐅𝐥𝐲𝐢𝐧𝐠 𝐄𝐚𝐠𝐥𝐞 🦅 (@FlyingXEagle) October 25, 2024
मागील तीन आठवड्यामध्ये बिग बॉसचा चर्चेत असलेला सदस्य अविनाश मिश्रावर त्याने केलेल्या कृत्यावर सलमान खान संतापलेला दिसत आहे. यामध्ये सलमान खान अविनाश मिश्रा प्रसारित झालेल्या प्रोमोमध्ये सांगत आहे की, अविनाश तू काय घरामधील देव आहेस का? स्पष्ट बोलणे आणि उद्धटपणे बोलणे यामध्ये फार फरक आहे आणि तू ती रेषा क्रॉस केली आहेस. नाव तुझं अविनाश आहे परंतु तू तुझा स्वतःचा विनाश करत आहेस.