Radhika Merchant (फोटो सौजन्य-Instagram)
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचे लग्न पाहण्यासारखे होते. हे आतापर्यंतचे सर्वात महागडे लग्न मानले जात आहे. या ग्रँड वेडिंग रिसेप्शनला जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. उधोजकांपासून ते क्रीडा आणि चित्रपटसृष्टीत लोकांचा मेळावा या लग्न सोहळ्यात चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. लग्न पार पडल्यानंतर अनेक पाहुण्यांनी या जोडप्यासाठी सुंदर लेख लिहिले आहेत. दरम्यान, अंबानी कुटुंबाने आपल्या नव्या सुनेचे मोठ्या थाटामाटात स्वागत देखील केले आहे.
राधिकाचे केले जल्लोषात स्वागत
राधिका आणि अनंत अंबानींची लहानपणापासून घट्ट मैत्री आहे. प्रदीर्घ नातेसंबंधानंतर, हे जोडपे शुक्रवारी, 12 जुलै रोजी एकमेकांच्या बंधनात अडकले गेले आहेत. अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनवर चाहत्यांची नजर होती. शाही पद्धतीने लग्न आणि त्यासंबंधित सर्व विधी पूर्ण केल्यानंतर राधिका मर्चंटचे घरातील प्रवेशदेखील खूप खास पार पडला आहे. अंबानी कुटुंबात तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
राधिका आणि अनंतवर फुलांची बरसात
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अंबानी कुटुंबीय राधिकाचे त्यांच्या घरी थाटात स्वागत करताना दिसत आहे. ईशा आणि श्लोक या सर्व प्रथम गंधक लावताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी उपस्थित कुटुंबीयांनी या दोघांवर फुलांची बरसात केली. तसेच या दोघांचे मोठ्या डोल तशात अंबानी कुटुंब स्वागत करताना दिसत आहेत. अंबानी कुटूंबाने खूप आनंदात राधिकाचा गृहप्रवेश केला.