(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
रेयू फिल्म्स आणि आदित्य भसीन प्रस्तुत देखा क्या? ही एक डॉक्यूड्रामा फिल्म आहे, जी बॅन्नो यांनी त्यांच्या प्रसिद्ध रेडिओ शो बोलता अंधेरा मधून सादर केली आहे. या चित्रपटामध्ये फ़िरोज़ाबादमधील मुलांचे वास्तव दाखवले आहे. जे काच बांगड्या बनवताना दृष्टी गमावत आहेत, तसेच शहरी गरीब मुलांशी तुलना केली आहे. जे फक्त जागरूकतेच्या अभावामुळे आंधळे होत आहेत. या चित्रपटाला वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हल, कान्स 2025 मध्ये प्रतिष्ठीत सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, डॉक्युमेंटरी शॉर्ट पुरस्कार मिळाला आहे.
हा चित्रपट दिग्दर्शक-निर्माता आदित्य भसीन आणि दृष्टी या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक – संजना चौहान यांच्या सहकार्याने करण्यात आला आहे. देखा क्या? हा असा एक विषय समोर आणतो जो अनेकदा दुर्लक्षित केला जातो.
आदित्य भसीन, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता, म्हणाले:“मी जेव्हा पहिल्यांदा संजनाकडून ऐकले की फ़िरोज़ाबादमधील मुले काच बांगड्या बनवताना आपली दृष्टी गमावत आहेत, तेव्हा ते मनातून पुसणे शक्यच नव्हते. ही एक अशी गोष्ट होती जी सांगणे आवश्यक होते, कारण शांत बसणे हा अन्याय ठरला असता. मला फक्त जे वाटले ते दाखवायचे होते आणि मला हे खूप अपेक्षित होते की लोक क्षणभर थांबून विचार करतील. जर ते साध्य झाले, तर माझे काम पूर्ण झाले. कान्समधील हे पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, परंतु खरं तर ते त्या मुलांचे आहेत ज्यांचे आवाज या चित्रपटातून झंकारतात.”
कतरिना आणि विकी लवकरच आई बाबा होणार? लवकरच करणार ‘या’ महिन्यात बाळाचे स्वागत
संजना चौहान, संस्थापक, दृष्टी, म्हणाल्या:“माझ्यासाठी दृष्टी म्हणजे फक्त एनजीओ सुरु करणे नव्हते… ते आपल्या आसपास घडणाऱ्या परिस्थितीत बदल घडवण्याचा प्रयत्न होता. फ़िरोज़ाबादमधील माझ्याच वयातील मुले काच बांगड्या बनवताना डोळ्यांची दृष्टी गमावत आहेत आणि त्यातून बाहेर पडण्याचा काहीही मार्ग नाही. हा एक कठीण चक्र आहे.
एकदा आदित्य माझ्याशी भेटायला आले तेव्हा मी त्यांना फ़िरोज़ाबादमधील माझ्या कॅम्पबद्दल सांगितले. मी त्यांना समजावले की कसे मुलांचे डोळे या कामामुळे जातात, आणि तिथूनच त्यांनी पूर्ण प्रक्रियेत मनापासून सहभाग घेतला आणि हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. मला त्यांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी जगासमोर हे सत्यकथन मांडले ज्यासाठी आम्ही इतका काळ जागरूकता निर्माण करत होतो.”
“इडलीसाठी सकाळी 4 वाजता उठून फुलं विकायचो” धनुषने सांगितली बालपणीची आठवण
कान्स वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखा क्या? ला मिळालेली ही आंतरराष्ट्रीय मान्यता हे दाखवून देते की कथा या जागरूकता आणि परिवर्तनासाठी प्रेरक ठरू शकतात. यातून दिसून येते की जेव्हा चित्रपट निर्माते आणि सामाजिक संस्था एकत्र येऊन कार्य करतात, तेव्हा गंभीर सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकता येतो आणि प्रेक्षकांना विचार करण्यास, लक्षात ठेवण्यास आणि कृती करायला प्रवृत्त करता येते.