बॉलीवूड कलाकारांचे दिवाळी मधील अप्रतिम फोटोने वेधले लक्ष (फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
परिणीती चोप्रा दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. हातात दिवा घेऊन अभिनेत्रीने फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
तसेच अभिनेत्री नेहा शर्माने तिच्या सर्व चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चाहते देखील अभिनेत्रीला शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर कंमेंट करत आहेत.
बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली आहे. सुनील शेट्टीसोबत पत्नीशिवाय मुलगी आणि जावईही फोटोमध्ये चमकत आहेत. तसेच चाहत्यांनी आवडत्या अभिनेत्याला देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
याशिवार बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची ही पहिलीच दिवाळी आहे. अभिनेत्रीने तिचा पती झहीर इक्बालसोबतचे दिवाळी साजरी करतानाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
माधुरी दीक्षितने देखील तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही अभिनेत्री १ नोव्हेंबरला 'भूल भुलैया ३' या चित्रपटात दिसणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
करीना कपूरने दिवाळीनिमित्त तिचा फोटो शेअर करत चाहत्यांना तिने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोमधील करीना कपूरची स्टाईल चाहत्यांना पसंत पडली आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.