(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘दृश्यम’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. साउथ इंडस्ट्रीत तयार झाल्यानंतर त्याचा हिंदी रिमेकदेखील सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या भागातील थरारक सस्पेन्स आणि दुसऱ्या भागातील बुद्धीचा खेळ प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून गेला.त्यामुळे चाहत्यांमध्ये दृश्यम ३’ची प्रचंड उत्सुकता आहे. मात्र दृश्यम ३’ची हवी असलेली चव प्रेक्षकांना या वेळी मिळणार नाही, असं दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी स्पष्ट केलं आहे.
”त्यांच्या मते, या चित्रपटात प्रेक्षकांना ज्या “थ्रिलरची चव” हवी आहे, ती त्यांना यावेळी मिळणार नाही.‘दृश्यम ३’ हा चित्रपट जास्त थ्रिल आणि सस्पेन्सवर आधारित न राहता, त्यात एक नवीन वळण असणार आहे”. अस त्यांनी स्पष्ट केलं आहे. या चित्रपटात थ्रिलरपेक्षा भावनिक कथेला अधिक महत्त्व देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे, ‘दृश्यम ३’ हा चित्रपट एकाच वेळी हिंदी आणि साउथ दोन्ही भाषांमध्ये शूट होणार आहे, जो एक नवा प्रयोग ठरणार आहे. अशा प्रकारचा प्रयोग भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचितच पाहायला मिळाला आहे. यामुळे या चित्रपटाच्या निर्मितीची पद्धत, कलाकार आणि अन्य महत्त्वाच्या बाबींकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
‘गुलाल’वरून पीयूष मिश्राने अनुराग कश्यपवर केली टीका; कश्यपचे करारा प्रत्युत्तर
‘दृश्यम ३’चित्रपटावर दिग्दर्शक जीतू जोसेफ यांचा खुलासा
“प्रेक्षकांना ‘दृश्यम’कडून थरारक खेळाची अपेक्षा असते. पण तिसऱ्या भागात तसं काही घडणार नाही. जर कुणाला वाटत असेल की दुसऱ्या भागासारखा इंटेलिजंट गेम असेल, तर त्यांची निराशा होईल,” असं खुद्द जोसेफ यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
थ्रिलर चित्रपट सतत दिग्दर्शित करून दमल्याचं मान्य करत जोसेफ म्हणाले की, ‘दृश्यम ३’ मध्ये ते वेगळं ट्रीटमेंट देणार आहेत. या भागाची कथा दुसऱ्या भागाच्या शेवटापासून सुरू होईल आणि ही फ्रँचायझीचा अखेरचा भाग असणार आहे. या चित्रपटात सस्पेन्सपेक्षा भावनिक नाट्यावर भर दिला जाणार आहे. प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी कथा आणि पात्रांच्या भावविश्वावर आधारित असणार आहे.
दिलीप प्रभावळकरांचा ‘दशावतार’ प्रेक्षकांच्या पसंतीस, दुसऱ्या दिवसाची कमाई कोटींमध्ये!
चित्रपटाचे कधीपासून शूटींग सुरू होणार?
दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्या माहितीनुसार, ‘दृश्यम ३’चं शूटिंग ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे.
‘दृश्यम ३’ हा चित्रपट शेवटचा भाग असेल का?
‘दृश्यम ३’ हा या फ्रँचायझीचा शेवटचा चित्रपट असेल, असं दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी स्पष्ट केलं आहे.