(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
ZEE5 हा भारतातील सर्वात मोठा एतद्देशीय, बहुभाषिक कथा सादर करणारा प्लॅटफॉर्म आहे. 10 ऑक्टोबर रोजी ‘वेदा’चा डिजिटल प्रीमियर ZEE5 प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक निखिल अडवाणी यांचे दिग्दर्शन आणि झी स्टुडिओज, एमी एंटरटेनमेंट आणि जेए एंटरटेनमेंट यांची निर्मिती असलेल्या या अॅक्शनने परिपूर्ण सिनेमात जॉन अब्राहम, शर्वरी आणि अभिषेक बॅनर्जी, तमन्ना भाटिया, आशिष विद्यार्थी या स्टार्सचा अभिनय पाहायला मिळणार आहे. खऱ्या घटनांपासून प्रेरित असलेल्या ‘वेदा’ सिनेमात एका दलित मुलीचा जातीवरून होणारा अन्याय आणि गुन्हेगारीविरोधातल्या लढ्याचा प्रवास पाहायला मिळणार आहे. या दसऱ्याला, 10 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ‘वेदा, संविधान का रक्षक’चा अभिनव आणि भावनिक प्रवास पाहायला मिळणार आहे.
‘वेदा, संविधान का रक्षक’ या सिनेमात मेजर अभिमन्यू कन्वर (जॉन अब्राहम) या कोर्ट मार्शल झालेल्या सैन्यदलातल्या अधिकाऱ्याची वेदा (शर्वरी) नावाच्या अन्यायाविरूद्ध सतत संघर्ष करणाऱ्या निश्चयी दलित मुलीशी भेट होते. एकत्रितपणे ते सखोल सामाजिक समस्यांविरूद्ध लढा देतात. कायम दडपशाही करणाऱ्या आणि त्यांना गप्प करण्याची धमकी देणाऱ्या गावच्या प्रमुखाविरोधात अभिषेक बॅनर्जी यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखेविरोधात हे दोघे लढा देतात. या दोघांना गुप्त सत्याची माहिती मिळते आणि ते उघड करण्यासाठी हे दोघेही लढा देतात. या सिनेमात धाडस, चिकाटी आणि न्यायाची दमदार कथा पाहायला मिळणार आहे.
निखिल अडवाणी यांनी दिग्दर्शित केलेला ‘वेदा, संविधान का रक्षक’ अॅक्शनने परिपूर्ण असून त्यात ठोस सामाजिक संदेश देण्यात आला आहे. या दसऱ्याला, 10 ऑक्टोबर पासून प्रेक्षकांना ZEE5 वर हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये पाहाता येणार आहे.
हे देखील वाचा- Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनसमोर उभ्या ठाकणार २ मंजुलिका, ‘भुल भुलैया ३’ मध्ये दिसणार डबल- ट्रबल
ZEE5 इंडियाचे प्रमुख व्यवसाय अधिकारी मनिष कालरा म्हणाले, ‘सिनेमामध्ये बदल घडवून आणण्याची ताकद असते आणि ‘वेदा’ हा सिनेमा दमदार कथा आणि कल्पक सादरीकरणातून महत्त्वाच्या सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणारा आहे. आम्हाला हा सिनेमा मनोरंजक पद्धतीने सादर करायचा होता आणि त्यातून न्याय आणि चिकाटीविषयी अर्थपूर्ण संवाद घडवून आणायचा होता. हा सिनेमा प्रभावी आणि क्रांतीकारी कथांच्या माध्यमातून प्रेक्षकांशी नाते जोडण्याच्या आणि त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आमच्या विचारांशी अनुरूप आहे. ‘वेदा’ या सिनेमासह आम्ही ZEE5ची प्रेक्षकांना दर्जेदार कंटेंट उपलब्ध करण्याची तसेच समाजात सकारात्मक बदल घडवून आणत वैविध्यपूर्ण प्रेक्षकांना आपलासा वाटेल असा कंटेंट सादर करण्याची बांधिलकी जपली आहे.’ असे त्यांनी सांगितले.