(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
‘बेबी जॉन’ हा चित्रपट २५ डिसेंबर २०२४ रोजी ख्रिसमसच्या निमित्ताने थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाच्या अॅक्शनमुळे बरीच चर्चा निर्माण करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाला आहे. यामध्ये वरुण धवन, वामिका गब्बी आणि कीर्ती सुरेश यांच्यासोबत अभिनेता जॅकी श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. अलीकडेच अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी चित्रपटाच्या अपयशावर प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात अपयश मिळाल्यामुळे त्यांनी त्यांचे मत मांडले आहेत.
निर्मात्यांसाठी वाईट वाटते असे का म्हणाला अभिनेता
‘बेबी जॉन’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील वाईट कामगिरीवर प्रतिक्रिया देताना जॅकी श्रॉफ म्हणतात की, त्यांना निर्मात्यांबद्दल वाईट वाटते. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी हे सांगितले आहे. बेबी जॉनमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ हे खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. ‘बेबी जॉन’ हा चित्रपट १८० कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. आणि या चित्रपटाने ५० कोटी रुपयेही कमाई करू शकला नाही.
निर्माते आत्मविश्वासाने पैसे गुंतवतात
जॅकी श्रॉफला विचारण्यात आले की चित्रपटाच्या खराब कामगिरीचा त्यांच्यावर परिणाम होतो का? यावर ते म्हणाले, ‘निर्मात्यांना सर्वात जास्त फटका बसतो. ते या प्रकल्पांमध्ये खूप पैसे गुंतवतात आणि ते मोठ्या आत्मविश्वासाने चित्रपट तयार करतात. जेव्हा ते हा खर्च ते वसूल करू शकत नाहीत तेव्हा त्यांना खूप वेदना होतात. एक अभिनेता म्हणून, आम्हाला आमच्या अभिनयाचे कौतुक व्हावे असे नक्कीच वाटते, पण चित्रपट चांगला चालावा अशी आमची इच्छा देखील असते.’ असे अभिनेत्याने सांगितले.
बजेटचा फक्त एवढाच टक्के भाग काढता आला
चित्रपटाच्या अपयशाबद्दल जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘मला दुःख वाटते, पण स्वतःसाठी नाही, मला निर्मात्यांसाठी जास्त दुःख वाटते’. तुम्ही तुमचे काम गांभीर्याने करता, पण आम्हाला त्या व्यक्तीचाही विचार करावा लागतो ज्याने त्यात पैसे गुंतवले आहेत. ‘ असे अभिनेत्याने पुढे म्हटले. ‘बेबी जॉन’ हा चित्रपट कॅलिसने दिग्दर्शित केला होता. तसेच या चित्रपटाची निर्मिती अॅटली, ज्योती देशपांडे आणि मुराद खेतानी यांनी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाला त्याच्या बजेटच्या फक्त २४.५५ टक्केच कमाई करता आली आहे.