
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Bigg Boss 19: सलमान खानने अभिषेक बजाजचा केला पर्दाफाश, अशनूरवरही साधला निशाणा; पाहा नवा Promo
ओटीटी प्लेच्या अहवालानुसार, “जॉली एलएलबी ३” लवकरच नेटफ्लिक्स आणि जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे, १४ नोव्हेंबर २०२५ हा चित्रपट ओटीटी रिलीजची होण्याची अपेक्षा आहे. परंतु, निर्मात्यांनी याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. सामान्यतः थिएटर आणि डिजिटल रिलीजमधील वेळ सहा ते आठ आठवड्यांचा असतो, त्यामुळे हा चित्रपट त्याच वेळी येण्याची शक्यता आहे.
‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटाबद्दल
सुभाष कपूर दिग्दर्शित हा चित्रपट ‘जॉली एलएलबी’ चा तिसरा भाग आहे आणि त्यात सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी, अमृता राव आणि गजराज राव यांच्याही भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आहेत. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि त्याच्या कोर्टरूम ड्रामाचे कौतुक केले आहे. दोन्ही अभिनेत्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे.
चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या पसंतीस
चित्रपटाच्या तिसऱ्या भागात प्रसिद्ध जॉली वकील एकत्र येतात. अक्षय कुमार जगदीश्वर मिश्रा (जॉली मिश्रा) ची भूमिका करताना दिसला आहे. तर, अर्शद वारसी जगदीश त्यागी (जॉली त्यागी) म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत, अक्षय कुमारने या चित्रपटासाठी अर्शद वारसीसोबत काम करण्याबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, “अर्शद वारसी आणि मी एकत्र येत आहोत, म्हणून जॉली १ आणि जॉली २ एकत्र येत आहेत. आणि मला त्याच्यासोबत काम करायला खूप मजा आली. तो खरोखरच खूप गोड माणूस आहे.” असे म्हणून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच आता हा चित्रपट ओटीटीवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.