‘स्टार प्लस’ वाहिनीवरील मालिका ‘दिल को तुमसे प्यार हुआ’ अखेर टीव्हीवर प्रसारित झाली आहे. दरम्यान या मालिकेच्या निर्मात्यांनी अदिती त्रिपाठी (दीपिका) आणि अक्षित सुखिजा (चिराग) यांचा एक रोमांचक प्रोमो प्रदर्शित केला आहे. या ‘प्रोमो’त प्रेक्षकांना दीपिकाच्या वेदना आणि तिला तिच्या सावत्र आई आणि सावत्र बहिणीकडून मिळणारी वाईट वागणूक बघायला मिळते आहे. दीपिकाच्या अंधाऱ्या आयुष्यात अभिनेता चिरागमुळे प्रकाशाची तिरीप आणि प्रेमाचा वर्षाव होती, हे देखील या प्रोमोत दाखवले आहे. या परीकथेची चर्चा आता बॉलिवूडपासून गुजराती मनोरंजन उद्योगापर्यंत सर्वत्र जोरदार सुरु आहे.
बॉलिवूड तारका मनारा चोप्रा आणि अलाया एफ यांनीही ‘दिल को तुमसे प्यार हुआ’ या मालिकेचे भरभरून कौतुक केले आहे आणि या मालिकेविषयी प्रेम व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर परीकथेबाबत त्यांनी आपली मतेही मांडली आहेत. मनारा चोप्राचा परीकथांवर विश्वास आहे आणि तिला वाटते की, ती स्वतः एक परीकथा जगते आहे. तर, अलाया एफला विश्वास वाटतो की, त्याग आणि कठोर परिश्रम ही तुमची स्वप्ने साध्य करण्याची गुरुकिल्ली आहे.असे त्यांनी या मालिकेबद्दल आपले मत स्पष्ट केले आणि आणि ‘दिल को तुमसे प्यार हुआ’ याचे कौतुक करताना त्या दिसल्या आहेत.
‘दिल को तुमसे प्यार हुआ’ या मालिकेने प्रसारमाध्यमांतील चर्चांमध्ये स्थान प्राप्त केले आहे आणि या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर, बॉलीवूड अभिनेत्रींपासून गुजराती सिनेसृष्टीतील तारकांपर्यंत-मनारा चोप्रा, अलया एफ, क्रिना पाठक, उर्वशी सोलंकी, नेहा हरसोरा, हिमांशी पाराशर, तहसीन पुनेवाला अशा अनेक अभिनेत्रींनी परीकथांबाबत आपले मत व्यक्त केले, ही चर्चा या मालिकेइतकीच रंजक ठरत आहे. आता या मालिकेचा आस्वाद प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
कामाच्या आघाडीवर, मनारा चोप्रा आणि अलाया एफ दोघेही बॉलीवूड मधील उत्कृष्ट अभिनेत्री आहे. मनारा चोप्रा नुकतीच बिग बॉस सीजन १७ मध्ये एक धमाकेदार स्पर्धक म्हणून दिसली होतो, तर अलाया एफबद्दल सांगायचे झाले तर ती नुकतीच राजकुमार राव चा सुपरहिट चित्रपट श्रीकांत मध्ये दिसली होती.