मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे लॅक्मे फॅशन वीक मधील आकर्षित लुक. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने फॅशन इंडस्ट्रीमध्ये लहरीपणा आणला असून ब्यूटी क्वीनसाठी हे क्षण खास ठरले आहेत. अलीकडेच अभिनेत्रीने प्रतिष्ठित लॅक्मे फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला.
मानुषी ऋषी आणि विभूती यांनी डिजाइल केलेला ड्रेस परिधान करून त्यांच्यासह रॅम्प वॉक केला. मानुषी छिल्लर ऑलिव्ह ग्रीन फुल लेन्थ स्कर्ट आणि मॅचिंग ब्लाउजसह मोहक दिसत होती.
मानुषी छिल्लरने तिच्या आत्मविश्वासाने आणि मोहकतेने प्रेक्षकांना चकित केले आणि फॅशन विश्वात पुन्हा चर्चेत आली. मानुषीचा हा ड्रेस तिच्यावर खूप शोभून दिसत होता.
ऑलिव्ह ग्रीन फुल लेन्थ स्कर्ट आणि मॅचिंग ब्लाउजसह आकर्षित मेकअपदेखील केला होता. मानुषीने रेखीव आयलायनर, गुलाबी ब्लश आणि न्यूड गुलाबी लिपस्टिकचा वापर करून हा लुक परिपूर्ण केला. मानुषीने तिचे केस देखील मोकळे ठेवले होते.
यासगळ्यासह ती खूप आकर्षित आणि सुंदर दिसत होती. फॅशन क्षेत्राच्या पलीकडे ब्युटी क्वीन तिच्या आगामी ‘तेहरान’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच अलीकडेच, तिने शहरातील एका प्रतिष्ठित कार्यक्रमात ट्रेलब्लेझिंग स्टार ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त केला आहे