(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेत्री निम्रत कौर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. निम्रतचे नाव अभिषेक बच्चनसोबत जोडले जात आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केला जात आहे आणि त्यामुळेच ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनपासून विभक्त झाला असल्याची चर्चा होत आहे. अभिनेत्री निम्रतने या सर्व अफवांवर फारसे काही सांगितले नाही आहे, परंतु ती तिच्या करिअरकडे पूर्ण लक्ष देत आहे. अक्षय कुमारचा आगामी चित्रपट निम्रतच्या हातात आहे, त्यानंतर ती आता खिलाडी कुमारसोबत चित्रपटगृहात झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.
अक्षय कुमारच्या चित्रपटात निम्रत कौरची एन्ट्री
मिळलेल्या माहितीनुसार, निम्रत कौर अक्षय कुमारसोबत त्याचा आगामी चित्रपट स्काय फोर्समध्ये दिसणार आहे. असा दावा केला जात आहे की या चित्रपटात निम्रत कौरची भूमिका खूप मनोरंजक असणार आहे. ज्यासाठी निम्रत लवकरच तयारी सुरू करताना दिसणार आहे. 8 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘एअरलिफ्ट’ चित्रपटात अक्षय कुमारसोबत निम्रत कौरही दिसली होती. या चित्रपटातील त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडली. अशा परिस्थितीत अक्षय कुमारचे चाहते पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अभिनेत्यासोबत निम्रत कौरची जोडी पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’ या चित्रपटात सारा अली खानचे नावही जोडले गेले आहे. निम्रत आणि सारा या दोघीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचा दावा केला जात आहे.
हे देखील वाचा- Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात जबरदस्त हाणामारी, हे दोन स्पर्धक एकमेकांना भिडले!
कधी होणार चित्रपट प्रदर्शित
अक्षय कुमारचा ‘स्काय फोर्स’ हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. निर्माते 24 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. या चित्रपटाची घोषणा या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाली होती. निम्रत कौर आणि सारा अली खान यांच्यासोबत अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’ या चित्रपटात आणखी एका कलाकारांची एंट्री होऊ शकते, असा दावा केला जात आहे.
हे देखील वाचा- भगवान परशुरामच्या भूमिकेत लवकरच विक्की कौशल झळकणार, अभिनेत्याच्या हाती लागला ब्लॉकब्लस्टर चित्रपट!
अक्षय कुमारचे आगामी चित्रपट
स्काय फोर्स व्यतिरिक्त अक्षय कुमारकडे अनेक मोठे चित्रपट आहेत. ज्यामध्ये ‘शंकारा’, ‘जॉली एलएलबी 3’, ‘हाऊसफुल’चा पाचवा भाग, ‘वेलकम टू द जंगल’, ‘भूत बांगला’, ‘हेरा फेरी 3’ आणि ‘कनप्पा’ यांसारख्या चित्रपटाचा समावेश आहे. तसेच हे कसगळे चित्रपट लवकरच सिनेमागृहात झळकणार आहेत, ज्याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.