PM Narendra Modi (फोटो सौजन्य - Instagram)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या दोघांचे १२ जुलै रोजी लग्न झाले. या दोघांचे लग्न जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले आहे. या लग्न सोहळ्यात अनेक अधोजक आणि सेलिब्रिटीची हजेरी लागली होती. तसेच सध्या चर्चेत असलेल्या या दोघांचा आशीर्वाद सोहळा नुकताच पार पडला आहे. हा सोहळा देखील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अनेक कलाकार आणि मोठे उधोजक सहभागी झाले होते. या आशीर्वाद सोहळ्यात PM नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थितीत होते.
अनंत-राधिकाने PM नरेंद्र मोदीचा घेतला आशीर्वाद
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी या दोघांनी देखील नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत केले. PM नरेंद्र मोदी जेव्हा या लग्न सोहळ्यात पोहचले तेव्हा ‘हरे रामा हरे कृष्णा’ हे भजन वाजत होते. तसेच नरेंद्र मोदी हात जोडून पुढे गेले. याचदरम्यान नरेंद्र मोदी यांच्यासह मुकेश अंबानी या सोहळ्यात फिरत होते. याचवेळी एनएसजी चे जवान त्यांच्या भवती घेरा घालून उभे होते. याचदरम्यान अनंत आणि राधिका नरेंद्र मोदी जवळ गेले आणि त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला.
या सोहळ्यात इतर कलाकार झाले सहभागी
वधूवारांना आशीर्वाद दिल्यानंतर पीएम मोदी या सोहळ्यातील अनेक कलाकारांना आणि पाहुण्यांना भेटले. आणि त्यावर ते या सोहळ्यातील भजन गीत ऐकण्यास बसले. पीएम मोदीव्येतिरिक्त या सोहळ्यात बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन, शाहिद कपूर आणि मदीय दीक्षितसह या सोहळ्यात अनेक परदेशी सेलिब्रिटी आणि बॉलीवूड सितारे सहभागी होते.
तसेच या सोहळ्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील या सोहळ्यात जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सहभागी झाले होते.