अभिनेता आणि चित्रपट निर्माता कृष्णा कुमार यांची मुलगी तीशा कुमार हिचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसातर तीशा कुमार चा मृत्यू हा कर्करोगामुळे झाला आहे हे उघड झाले आहे. तीशा गेले खूप वर्ष या रोगाचा सामना करत होती. अखेर ती या सामन्यात अयशस्वी ठरली आणि वयाच्या २१ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला.
तीशा कुमारला कर्करोगाचे काही वर्षांपूर्वी निदान झाले होते. तिचे मुंबईमध्ये उपचार सुरु होते परंतु या उपचारादरम्यान कोणतेच यश मिळत नसल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला जर्मनीमध्ये उपचारासाठी घेऊन गेले. नंतर तिचे जर्मीनी मधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु देखील होते परंतु, या उपचारादरम्यान तिने तिथेच अखेरचा श्वास घेतला आणि १८ जुलै रोजी जर्मनीतील रुग्णालयात ती देवाज्ञा झाली.
तीशाचा ६ सप्टेंबर २००३ रोजी झाला होता. आणि तिचे वडील कृष्णा कुमार आणि आई तान्या सिंग या दोघांनादेखील खूप आनंद झाला होता. तीशा ही कृष्णा कुमार यांची लाडकी मुलगी होती. प्रत्येक चित्रपटाच्या इव्हेंटला ती तिला सोबत घेऊन जायचे. तीशा अनेकदा मोव्हिस्कीनिंग आणि इव्हेंटमध्ये त्यांच्या सोबत दिसली होती. गेल्यावर्षी तिने नोव्हेंबरमध्ये रणवीर कपूरचा अॅनिमल या चित्रपटाच्या मोव्हिस्कीनिंला हजेरी लावली होती. या वेळी तिने वडिलांसोबत काही अप्रतिम फोटो क्लिक केले होते.
हे देखील वाचा – ‘दिल को तुमसे प्यार हुआ’ या मालिकेचे मनारा चोप्रा आणि अलाया एफने केले कौतुक!
तिचे वडील कृष्णा कुमार हे दिग्गज अभिनेता आणि निर्माता आहेत. तसेच टी-सीरीज कंपनीचे संस्थापक गुलशन कुमार यांचे धाकटे भाऊ आहेत. त्यांनी १९९३ मध्ये ‘आजा मेरी जान’ या चित्रपटातून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. याच वर्षी त्यांचे ‘कसम तेरी कसम’ आणि ‘शबनम’ हे सिनेमेदेखील चित्रपटगृहात दाखल झाले होते. ‘बेवफा सनम’ या चित्रपटातून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. सुरुवातीला त्यांनी अभिनय केला आणि नंतर निर्माता म्हणून काम करू लागले.
याचदरम्यान आता तीशाच्या निधनानंतर कुमार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तीशाच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.