(फोटो सौजन्य - अकाउंट)
अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रेड २’ प्रदर्शित होण्यासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. दरम्यान, चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर याबद्दल माहिती देणारा एक अद्भुत प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. “सिस्टम हादरणार आहे… तुमची सीट कन्फर्म झाली आहे का? आत्ताच तुमचे तिकीट बुक करा,” असे एका अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘रेड २’ चित्रपट पाहण्यासाठी चाहते चांगलेच उत्साही आहेत.
ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चांगला ट्रेंड
१ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचे सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत. ‘रेड २’ ने आतापर्यंत १९०० शोसाठी १११० तिकिटे ॲडव्हान्स बुकिंग करून विकली आहेत. यासह चित्रपटाने ३ लाख ७० हजार रुपये कमावले आहेत. जर ब्लॉक सीट्स जोडल्या तर हा आकडा ११.४३ लाख रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. रिलीजला अजून तीन दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे येत्या काळात बुकिंग वाढेल असा विश्वास आहे. सोशल मीडियावरील चाहत्यांची उत्सुकता पाहता, पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ओपनिंग करू शकेल अशी अपेक्षा आहे.
‘या’ दिवशी प्रदर्शित होणार आमिर खानचा ‘Sitaare Zameen Par’, काय असेल चित्रपटाचा विषय?
चित्रपटात दिसणार हे कलाकार
‘रेड २’ मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या भागात त्याच्या दमदार अभिनयाने आणि तीव्र शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी त्याच्यासोबत रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो कथेत एक वेगळा ट्विस्ट आणेल. वाणी कपूर या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आहे. ती अमायच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट राजकुमार गुप्ता यांनी दिग्दर्शित केला आहे. जो १ मे २०२५ रोजी संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
काय आहे ‘रेड २’ ची कथा?
पहिल्या भागाप्रमाणेच ‘रेड २’ ची कथाही भ्रष्टाचार आणि करचुकवेगिरीविरुद्धच्या एका आयकर अधिकाऱ्याच्या लढ्यावर आधारित आहे. यावेळी, अमय पटनायक व्यवस्थेतील काळं सत्य मोठ्या प्रमाणात उघड करताना दिसणार आहे. कथेतील रितेश देशमुखची भूमिका एका धूर्त आणि शक्तिशाली खलनायकाची आहे. प्रेक्षकांना चित्रपटात अॅक्शन, ड्रामा आणि सस्पेन्सचा पूर्ण सीन पाहायला मिळणार आहे.