(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रिअॅलिटी शो ‘राइज अॅन्ड फॉल’ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि फिनालेच्या अगदी आधीच प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना एक धक्का बसला आहे. शोमध्ये एकाच वेळी दोन लोकप्रिय स्पर्धकांची एक्झिट झाली असून, कीकू शारदा आणि आदित्य नारायण यांना शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. गेल्या एपिसोडमध्ये एलिमिनेशनसाठी कीकू शारदा, आदित्य नारायण, आकृती नेगी आणि नयनदीप रक्षित हे नॉमिनेट झाले होते.
वोटिंग दरम्यान टेन्शनचं वातावरण झालं होत, आणि सर्वांचं लक्ष निकालाकडे लागलं होत.
पहिल्या, रूलर्सनी कीकू शारदाला नॉमिनेट केलं आणि त्याला शोमधून बाहेर केलं.पुढे, बेसमेंटमधील बाली, आरुष भोला आणि मनीषा रानी यांनी आदित्य नारायणचं नाव घेतलं, आणि स्पर्धेबाहेर केलं. डबल एलिमिनेशन जाहीर होताच, संपूर्ण सेटवर भावनिक वातावरण निर्माण झालं.
सतत एकमेकांशी भिडणारे बाली आणि आदित्य या प्रसंगी भावूक झाल्याचे पाहायला मिळालंहे दृश्य पाहून प्रेक्षकांसह बाकी स्पर्धकांना देखील वाईट वाटले. शोच्या सुरुवातीपासूनच आदित्य, अरबाज पटेल आणि धनश्री वर्मा यांचं त्रिकुट प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिलं होते. या तिघांमध्ये फारच जवळचं नातं तयार झालं होतं.
जेव्हा फिनाले पूर्वी आदित्यचं एलिमिनेशन जाहीर झालं, तेव्हा धनश्री आणि अरबाज आपले अश्रू रोखू शकले नाहीत. दोघंही सेटवर रडताना दिसले. आदित्यने त्यांचा खूप जवळचा मित्र म्हणून शोमध्ये नेहमीच त्यांचं समर्थन केलं होतं.
Bigg Boss 19 : बाहेर आल्यानंतर झीशान कादरीचे डोळे उघडले! अमालला म्हणाला “धोकेबाज”, तर कुनिका “लबाड”
‘राइज अॅन्ड फॉल’ शो आता हळूहळू फिनालेच्या दिशेने सरकत आहे. स्पर्धा जसजशी तीव्र होते आहे, तसतसे स्पर्धकांमध्ये तणावाचं वातावरण वाढताना दिसतंय.अशा तणावपूर्ण क्षणी, आपल्या खास विनोदी शैलीत कीकू शारदाने सगळ्यांना थोडा विरंगुळा दिला.त्याने स्वतःला ‘ज्योतिष’ घोषित करत सर्व स्पर्धकांचं भविष्य सांगायला सुरुवात केली आणि सेटवर हास्याचं वातावरण निर्माण झालं.