(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
14 वर्षांपासून, तापसी पन्नूने रोमान्स, थ्रिल, सस्पेन्स आणि कॉमेडीसह फिल्मी दुनियेत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने चित्रपटामधील तिचे सर्व पात्रे उत्कृष्ट पद्धतीने केले आहेत. आता 37 वर्षांची तापसी तिच्या कृतीने खळबळ माजवणारी आहे. तिने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. मनमर्जियां, हसीन दिलरुबा, रश्मी रॉकेट आणि आयी हसीन दिलरुबा नंतर तापसी पन्नूने पुन्हा एकदा कनिका ढिल्लनसोबत हातमिळवणी केली आहे. कनिकाने तापसीसोबत रोमँटिक आणि थ्रिलर सिनेमांमध्ये काम केले आहे. आता कनिकाने लिहिलेल्या ॲक्शन चित्रपटात तापसीचा दमदार अवतार पाहायला मिळणार आहे.
गांधारीमध्ये तापसी पन्नूचा ॲक्शन अवतार
तापसी पन्नूचा आगामी चित्रपट गांधारी लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे, ज्याची घोषणा 10 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटोसह करण्यात आली आहे. गांधारीच्या क्लिपमध्ये तापसीने पार्श्वभूमीच्या आवाजात म्हटले आहे की, “असे म्हटले जाते की आईचे आशीर्वाद नेहमीच सगळ्यांसोबत असतात, परंतु प्रश्न जेव्हा तिच्या मुलाचा येतो तेव्हा काली देखील बनते.” असे ती यामध्ये बोलताना दिसली आहे.
तापसी पन्नूने स्क्रिप्ट वाचली
व्हिडिओसोबत एक फोटोही शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये तापसी पन्नू आणि कनिका ढिल्लन एकत्र पोज देत आहेत. तापसी ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमध्ये अप्रतिम दिसत आहे, तर कनिका ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. स्क्रिप्ट तापसीच्या समोरील टेबलावर ठेवली आहे. चित्रपटाच्या घोषणेच्या पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “सुंदर लेखिका आणि अभिनेत्री पुन्हा परत आल्या आहेत. कनिका ढिल्लन आणि तापसी पन्नू एका ॲक्शन थ्रिलरसह परतणार आहेत.” असे लिहून ही पोस्ट शेअर केली आहे.
हे देखील वाचा- कियारा आणि हृतिक रोशनच्या हटके रोमँटिक प्रेमकथेसाठी सज्ज व्हा, ‘वॉर 2’बाबत मोठे अपडेट आले समोर!
हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही
तापसी पन्नूचा गांधारी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि बाकीच्या स्टारकास्टची घोषणा करण्यात आलेली नाही. तापसीच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलायचे झाले तर ती या चित्रपटात आईची भूमिका साकारणार असल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे. कनिका ढिल्लन या चित्रपटाची निर्मिती करत आहे.