साजिद नाडियावाला दिग्दर्शित “हाऊसफुल ५” या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना कॉमेडीयाचा डबल धम्मका पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एका नव्या कथेसह आणि कलाकारांसोबत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील कलाकारांचे कास्टिंगसुद्धा अप्रतिम झाले आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अक्षय कुमार आणि रितेश देशमुखसह अभिषेक बच्चन यांची देखील भूमिका पाहायला मिळणार आहे. तसेच या तिघांच्या केमिस्ट्रीसोबत अजून एक रॉक कलाकार यांच्यासोबत मुख्यभूमीकेत काम करताना दिसणार आहे.
“हाऊसफुल ५”मध्ये आणखी एक एन्ट्री
तरुण मनसुखानी यांच्या दिग्दर्शनाखाली होणारा “हाऊसफुल ५” या चित्रपटाची ओढ प्रेक्षकांना खूप वर्षांपासून लागली होती. ४ भागांच्या ब्लॉकब्लस्टर चित्रपटाच्या यशानंतर आता “हाऊसफुल ५” हा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. हा चित्रपट नक्कीच मजेदार कथा घेऊन येणार याची त्यांना खात्री आहे. त्यामुळेच अशा लोकांची स्टारकास्टमध्ये निवड केली आहे, जे कॉमेडीच्या माध्यमातून लोकांना हसवण्यात माहिर आहेत. साजिद नाडियाडवालाने ‘हाऊसफुल ५’साठी आणखी एका मोठ्या अभिनेत्याच्या नावाची घोषणा केली आहे.
सोशल मीडियावर शेअर करत निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी लिहिले की, ‘#NGEFamily ला ही खुशखबर सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की संजय दत्त ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटासाठी जॉईंट होत आहेत! या पुढील कॉमेडी प्रवासात काम करण्यास मी उत्सुक आहे.” असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
कधी रिलीज होणार चित्रपट
‘हाऊसफुल ५’ यासाठी अनिल कपूरचेही नाव पुढे आले होते. मात्र, नंतर तो चित्रपटाचा भाग नसल्याची बातमी समोर आली. आता या चित्रपटाच्या ताज्या आवृत्तीत संजय दत्तची एन्ट्री निश्चित झाली आहे. ‘हाऊसफुल ५’ च्या रिलीजच्या तारखेबद्दल बोलायचे तर हा चित्रपट पुढच्या वर्षी २०२५ मध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ऑगस्टमध्ये त्याचे शूटिंग सुरू होणार असून, ‘हाऊसफुल ५’ चे चित्रीकरण हे लंडनमध्ये होणार आहे.