(फोटो सौजन्य - x अकाउंट)
ऑपरेशन सिंदूरमुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सैन्याने पूर्णपणे हाणून पाडला. काल रात्री, पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, फिरोजपूर, कपूरथळा, जालंधर आणि जैसलमेर येथील लष्करी तळांवर आणि शस्त्रास्त्र केंद्रांवर लढाऊ विमाने, ड्रोन, रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला केला. ज्याचा बदला भारतीय लष्कराने पाकिस्तानचे दोन जे-१७ आणि एक एफ-१६ विमान पाडून घेतला. दरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी रात्रभर सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत राहिले. जम्मू-काश्मीरमधील कोणत्या सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत हे आपण जाणून घेऊयात.
अभिनेता अली गोनीने काळजीचे कारण सांगितले
भारतीय टीव्ही अभिनेता आणि मॉडेल अली गोनी, ज्यांचे जन्मस्थान जम्मू आणि काश्मीर आहे त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्याच्या एक्स अकाउंटवर ट्विट करून अभिनेत्याने आपली चिंता व्यक्त केली. त्याने ट्विट केले की, ‘मी भारताबाहेर शूटिंग करत आहे आणि माझे कुटुंब जम्मूमध्ये आहे. मी इथे खूप अस्वस्थ होतो, देवाचे आभार की सर्वजण सुरक्षित आहेत. आपल्या भारतीय हवाई दलाचे आभार. यासोबतच त्याने लाल हृदयाच्या इमोजीसोबत भारतीय तिरंगा देखील जोडला आहे.’
स्टोरी इंस्टाग्रामवर देखील पोस्ट केली
अभिनेता अली गोनी यांनी भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईचे कौतुक केले. याशिवाय, अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की तो पूर्णपणे सुन्न आहे. लोकांना जम्मू आणि त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
समय रैनाने जम्मूमध्ये वडिलांशी साधला संवाद
जम्मू आणि काश्मीरमध्ये जन्मलेला युट्यूबर आणि कॉमेडियन समय रैना यानेही जम्मूमध्ये त्याच्या वडिलांशी फोनवर बोलला आहे. तो म्हणाला की वडिलांच्या आवाजात स्थिरता आणि शांतता होती, ज्यामुळे त्याला धीर मिळाला. त्याच वेळी, रैना म्हणाले की जम्मूमधील सर्व काही भारतीय सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे.
आयसीयूमधून अखेर बाहेर आला Pawandeep Rajan, वेदनेतही आनंदी हसताना दिसला गायक!
My cousin brother #SunilKher sent this video from his home in Jammu. I called immediately and asked him if he and his family are ok? He laughed a little proudly and said, भैया! हम भारत में है! हम हिंदुस्तानी है।हमारी सुरक्षा भारतीय सेना और माता वैष्णो देवी कर रही है।आप टेंशन मत… pic.twitter.com/fv8UmCILC0
— Anupam Kher (@AnupamPKher) May 8, 2025
अनुपम खेर यांनी जम्मूमध्ये त्यांच्या भावाशी संवाद साधला.
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी जम्मूमध्ये असलेल्या त्यांच्या भावाशी संवाद साधला. त्यांनी ट्विट केले की, ‘माझा चुलत भाऊ सुनील खेर यांनी जम्मूतील त्यांच्या घरातून हा व्हिडिओ पाठवला आहे. मी लगेच फोन केला आणि त्याला विचारले की कुटुंब ठीक आहे का? तो थोडा अभिमानाने हसला आणि म्हणाला, ‘भाऊ, आपण भारतात आहोत.’ आपण भारतीय आहोत. आमची सुरक्षा भारतीय सैन्य आणि माता वैष्णोदेवी करत आहे. तुम्ही काळजी करू नका. आपले कोणतेही मिसाईन जमिनीवर पडणार नाही. देवीला नमस्कार. भारत माता की जय.’ असं ते म्हणाले आहेत.