ट्विटरला सध्या #BoycottKapilSharmaShow हा हॅशटॅग टॉप ट्रेंडिगला आहे. नेमकं असं काय घडलं आहे की, टीआरपीला नंबर वन असलेला हा शो बंद करावा अशी मागणी नेटिझन्स करत आहेत. खरंतर कपिल शर्मा शो आणि वाद हे काही नवं नाही. अनेकदा हा शो वादाच्या भोव-यात सापडला आहे आणि सध्या या शोमुळे नवा वाद सुरु आहे. बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (vivek Agnihotri) यांनी कपिल शर्मावर (kapil sharma) केलेल्या आरोपांनंतर वाद निर्माण झाला असून नेटिझन्स चांगलेच संतापले आहेत. हा वाद इतका वाढला आहे की, नेटिझन्स कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी करत आहेत.
विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत स्पष्टीकरण देताना लिहलं की. कपिल शर्माने त्याच्या कार्यक्रमात ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files)या आपल्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यास नकार दिला आहे. आपल्या चित्रपटात कोणताही मोठा स्टार अभिनेता नसल्याने कपिल शर्मा शोने कार्यक्रमात प्रमोशन कऱण्याची विनंती फेटाळली असा विवेक अग्निहोत्रींचा आरोप आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या या आरोपांनंतर ट्विटरवर कपिल शर्मा शो ट्रेडिंगमध्ये आहे. नेटिझन्स चॅनेल आणि कपिल शर्माच्या निर्मात्यांवर टीका करत असून प्रमोशन करण्यास नकार दिल्याने संताप व्यक्त करत आहेत.