CID Season 2: नवीन ट्विस्ट घेऊन लवकरच येणार CID चा नवा अध्याय, प्रोमो सोशल मिडीयावर प्रदर्शित
टीव्हीवरील लोकप्रिय कॉप थ्रिलर शो सीआयडी 6 वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. नुकतेच एका प्रोमोद्वारे शोच्या पुढील सीझनची घोषणा करण्यात आली. एसीपी प्रद्युम्न म्हणजेच अभिनेता शिवाजी साटम त्यांचे दोन वरिष्ठ अधिकारी अभिजीत म्हणजेच आदित्य श्रीवास्तव आणि दया म्हणजेच दयानंद शेट्टी यांच्यासह शोमध्ये परतत आहेत. या शोचा प्रोमो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. प्रोमो पाहून अगदी सर्वचजण सीआयडीच्या नवीन सीझनसाठी अतिशय उत्सुक आहेत.
हेदेखील वाचा- Bigg Boss 18 : करणवीर मेहरा आणि व्हीव्हीएन डिसेना कोणाचं हृदय काळं?
आता लवकरच असा एक शो परतत आहे, ज्याने 20 वर्षे टीव्हीवर राज्य केले. हा शो कॉप थ्रिलर सीआयडी आहे. या शोने 20 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. CID चा शेवटचा भाग 2018 मध्ये ऑन एअर झाला होता. त्यानंतर प्रेक्षकांनी अनेकदा ह्या शोच्या नवीन सीझनची मागणी केली होती. त्यांची ही मागणी आता पूर्ण होणार आहे. 6 वर्षांनंतर आता CID चा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 24 ऑक्टोबरला त्याची पहिली झलक शेअर करून सीआयडीच्या परतीची घोषणा करण्यात आली. (फोटो सौजन्य – pinterest)
सीआयडीचा नवा अध्याय सर्वांपेक्षा वेगळा असणार आहे. यावेळी एसीपी प्रद्युम्न हे दुसऱ्याच्या हत्येचा तपास करणार नसून दया यांची हत्या करणाऱ्या अभिजीतचाच तपास करणार आहेत. शोमध्ये एक नवा ट्विस्ट येणार आहे, जे ताज्या प्रोमोवरून स्पष्ट झाले आहे. प्रोमोमध्ये अभिजित दयावर गोळी झाडताना दिसत आहे. तर एसीपी प्रद्युम्न समोरून धावत येत आहेत.
CID ची सुरुवात 1998 मध्ये झाली आणि 2018 पर्यंत तो यशस्वीरित्या टीव्हीवरील टॉप रेटेड शो राहिला. 6 वर्षांनंतर तो पुनरागमन करत आहे, परंतु प्रीमियरची तारीख अद्याप उघड झालेली नाही. हा कार्यक्रम सोनी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
हेदेखील वाचा- Bigg Boss 18 : तिसऱ्या आठवड्यात बिग बॉस 18 च्या घरात हे टॉप 5 स्पर्धक! प्रेक्षक Ormax वर संतापले
जे देशासाठी नेहमी एकत्र लढले, ते आज शत्रू म्हणून समोरासमोर का उभे राहायचे? दरम्यान, दया अभिजीतला गोळीबार करण्यास प्रवृत्त करतो आणि अभिजीतने त्याच्या छातीवर दोन गोळ्या झाडल्या आणि तो खड्ड्यात पडला. एसीपी प्रद्युम्न काही अंतरावर उभे असतात आणि अभिजीतला गोळी मारताना पाहतात आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र अभिजित कोणाचंही न ऐकता दयावर गोळी चालवतो.
प्रोमोमध्ये असे दिसून येते की जेव्हा अभिजीत दयाला टेकडीच्या मध्यभागी गोळी मारतो तेव्हा त्या ठिकाणी आणखी बरेच लोक मृतावस्थेत पडलेले असतात. प्रोमोसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, अभिजीत त्याची जुनी मैत्री का विसरला आणि त्याने दयावर गोळी चाालवली.
सीआयडी हा एकेकाळी 90 च्या दशकातील मुलांचा आवडता शो होता. अशा परिस्थितीत या शोच्या पुनरागमनाने चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे. प्रोमो शेअर केल्यानंतर त्याच्यावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका यूजरने लिहिले, “अखेर आमचे बालपण परत आले आहे. तुमचे स्वागत आहे.” तर एका युजरने म्हटलं आहे की, आम्ही आमच्या आवडत्या शोची वाट पाहत आहोत.