nawazuddin
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नवाजुद्दीनच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी तिची चौकशी देखील करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्याची पत्नी आलिया सिद्दीकीला (Aaliya Siddhiqui) कोर्टाने समन्स बजावलं आहे. कोर्टाने 22 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आलियाने आपला पती नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तिच्या सासरच्या मंडळींविरोधात पॉक्सो (Pocso) कायद्याअंतर्गत तसेच इतर काही कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी नवाजच्या पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं की, 2012 साली मी माझ्या सासरी गेले होते. त्यावेळी दिराने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्यावेळी आलियाच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये झीरो एफआयआर दाखल करण्यात आला होता. नंतर हे प्रकरण बुढाणा पोलीस स्टेशनला वर्ग केलं होतं.
या तक्रारीनंतर आलियाला एकदा कोर्टात हजर राहावं लागलं होतं, ज्यामध्ये तिने तिचा जबाब नोंदवला होता. मात्र, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासानंतर कोणत्याही प्रकारचा पुरावा न मिळाल्याने पॉक्सो कोर्टाने क्लोजिंग रिपोर्ट दाखल केला होता. या प्रकरणी आलियाला न्यायालयात हजर राहण्यासाठी बोलावण्यात आलं होतं, मात्र ती हजर झाली नाही. यानंतर बुधवारी (8 फेब्रुवारी) न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली, मात्र आलिया तेव्हा देखील गैरहजर राहिली. आलिया सतत हजर न राहिल्यामुळे कोर्टात तिला समन्स पाठवलं आहे. आलियाला आता 22 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलं आहे.