rohit saraf (फोटो सौजन्य - Instagram)
रोहित सराफ स्टारर ‘इश्क विश्क रिबाऊंड’ रिलीज होण्यासाठी फक्त ३ दिवस उरले आहेत आणि चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला रुपेरी पडद्यावर चमकताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. रोहित सराफ अथकपणे चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत यात तो रोमँटिक लीड म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. ट्रेलरने त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आणि चित्रपटातील प्रत्येक नवीन गाण्याने केवळ या रोमान्स-ड्रामाचा आस्वादच दिला नाही तर त्याभोवतीची उत्सुकता देखील वाढवली आहे.
रिलीझची तारीख अगदी जवळ आल्याने 21 जूनसाठी चाहत्यांचा उत्साह हा अजून वाढत असून रोहित सराफने चित्रपटाविषयी माहिती सांगताना म्हणाला की, “ही एक नवीन कथा आहे. ही एक प्रेमकथा आहे जी अनेक गोष्टींबद्दल अनेक गोष्टी सांगून जाते म्हणूनच ती रोमांचक आहे.” रोहित या चित्रपटात लेखकाच्या भूमिकेत दिसणार आहे ज्यात त्याच्या सहकलाकार पश्मिना रोशन, नाइला ग्रेवाल आणि जिब्रान खान यांच्या अभिनयात पहिले पदार्पण असणार आहे.
तसेच या चित्रपटातील ‘सोनी सोनी’, ‘इश्क विश्क प्यार व्यार’ आणि ‘छोट दिल पे लागी’ हे तीन अप्रतिम गाणी आऊट झाले अजून, या गाण्यांना चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. आणि आता हि सगळी गाणी मोठ्या प्रमाणावर ट्रेंड केले जात आहे. त्याचदरम्यान आता ‘गोरे गोरे मुखडे पे’ हा नवा ट्रॅक चाहत्यांच्या समोर आला. तो देखील मोठ्या प्रेमात वाजत असताना दिसत आहे.
‘इश्क विश्क रिबाउंड’ व्यतिरिक्त रोहित सराफ मिसमॅच्ड सीझन 3 मध्ये ऋषी शेखावतच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. तो वरुण धवन, जान्हवी कपूर आणि सान्या मल्होत्रा यांच्यासोबत ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ नावाच्या धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटात काम करताना प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. हे सगळे त्याचे नवीन प्रोजेक्ट्स घेऊन लवकरच चाहत्यांच्या भेटीस येईल.