गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातून कोणतीही चांगली बातमी येत नाही. अलिकडेच गायक केके यांच्या आकस्मिक निधनाने लोकांना हादरवून सोडले. आता चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालचे दिग्गज आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक तरुण मजुमदार यांचं कोलकातामध्ये निधन (Tarun Majumdar Passed Away) झालं आहे. सूत्रांनी सांगितले की, ९२ वर्षीय चित्रपट दिग्दर्शक मजुमदार यांना किडनीच्या समस्येच्या तक्रारीनंतर काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांच्यावर एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तरुण मजुमदार यांच्या निधनानंतर पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी शोक व्यक्त केला आहे.
[read_also content=”‘अनन्या’ चित्रपटातील ‘न कळता’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला https://www.navarashtra.com/photos/ananya-movie-na-kalta-song-released-nrsr-300366.html”]
तरुण मजुमदार यांना १९६२ मध्ये आलेल्या बंगाली चित्रपट ‘कंचर स्वर्ग’ साठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तरुण मजुमदार यांना राष्ट्रीय पुरस्कार, बीएफजेए पुरस्कार आणि निमंत्रणासाठी फिल्मफेअर पुरस्कार (१९७१) मिळाला. याशिवाय गणदेवता (१९७९) त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. त्यांना १९९० मध्ये पद्मश्री आणि पाच फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तरुण मजुमदार यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर त्यांनी बालिका बधू (१९६७), कुहेली (१९७१), श्रीमान पृथ्वीराज (१९७३), फुलेश्वरी (१९७४), दादर कीर्ती (१९८०), भालोबासा (१९८५) आणि आप अमर आप (१९९०) हे ब्लॉकबस्टर चित्रपट केले.