भारताची हरनाज संधू मिस युनिव्हर्स बनली आहे. तब्बल २१ वर्षांनंतर एका भारतीय सौंदर्यवतीला हा किताब मिळाला आहे. लारा दत्ता 2000 साली मिस युनिव्हर्स बनली होती. तेव्हापासून भारत या विजेतेपदाची प्रतीक्षा होती. 70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये झाली. तर बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला मिस युनिव्हर्स स्पर्धेला जज करण्याची संधी मिळाली. ती भारतासाठी ज्युरी टीमचा भाग होती.
चंदीगडच्या हरनाज संधूने अलीकडेच ‘मिस दिवा मिस युनिव्हर्स इंडिया 2021’चा किताब जिंकला. तेव्हापासून तिने मिस युनिव्हर्स 2021 चा ताज जिंकण्यासाठी मेहनत करायला सुरुवात केली.
The new Miss Universe is…India!!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/DTiOKzTHl4 — Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021
21 वर्षीय हरनाज व्यवसायाने मॉडेल आहे. तिचे सुरुवातीचे शिक्षण शिवालिक पब्लिक स्कूल, चंदीगड येथून झाले. चंदीगडमधून ग्रॅज्युएशन केल्यानंतर, सध्या ती मास्टर्सचे शिक्षण पूर्ण करत आहे. मॉडेलिंग करून आणि अनेक स्पर्धा जिंकूनही, तिने स्वतःला अभ्यासापासून दूर ठेवले नाही.
हरनाझचे संपूर्ण कुटुंब शेती आणि नोकरी करते. तिने 2017 मध्ये कॉलेजमध्ये एका शोमध्ये पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला होता. त्यानंतर हा प्रवास सुरू झाला. हरनाझला घोडेस्वारी, पोहणे, अभिनय, नृत्य आणि प्रवासाची खूप आवड आहे. जर तीला वेळ असेल ती हे छंद पूर्ण करत वेळ घालवते. भविष्यात संधी मिळेल तेव्हा चित्रपटात काम करण्याचीही तिची इच्छा आहे.