pathaan housefull in kashmir
अभिनेता शाहरुख खाननं (Shahrukh Khan) ‘पठाण’ चित्रपटामधून 4 वर्षांनी कमबॅक केलं आहे. ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज झाला आहे. सिनेमानं दुसऱ्याच दिवशी 70 कोटींची कमाई केली आहे. हिंदी सिनेमाच्या इतिहासात हा नवा रेकॉर्ड तयार झाला आहे. संपूर्ण देशभरात तर ‘पठाण’ गाजतोयच पण काश्मीरमध्येही (Kashmir Valley) पठाणनं वेगळा इतिहास रचला आहे . ‘पठाण’ रिलीज होताच तब्बल 32 वर्षांनी काश्मीर घाटीतील थिएटर्सवर हाऊसफुल्लची पाटी झळकली आहे.
‘पठाण’ ने पहिल्याच दिवशी सिनेमा 25 कोटींची कमाई केली. काश्मीरच्या घाटीत ‘पठाण’ सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. तब्बल 32 वर्षांनी इथले थिएटर्स हाऊसफुल्ल झाले आहेत. मल्टीप्लेक्स चेन असलेल्या INOX Leisure Ltdनं ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
Today, with #Pathaan frenzy gripping the nation, we are grateful to KING KHAN for bringing the treasured #HOUSEFULL sign back to the Kashmir Valley after 32 long years! Thank you #ShahRukhKhan? @iamsrk @thejohnabraham @deepikapadukone @YRF @PathaanTheFilm #YRF50 pic.twitter.com/bkOvyjMrOh
— INOX Leisure Ltd. (@INOXMovies) January 26, 2023
INOXनं ट्विट करत म्हटलंय, “आज पठाणची क्रेझ देशभर पाहायला मिळत आहे. तब्बल 32 वर्षांनी काश्मीर खोऱ्यातील थिएटर्समध्ये हाऊसफुल्लची पाटी परत आणल्याबद्दल आम्ही किंग खानचे आभारी आहोत. थँक यू शाहरुख”.
‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारीला रिलीज झाला आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यानं प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात आपला मोर्चा ‘पठाण’कडे वळवल्याचं पाहायला मिळालं. सिनेमानं दुसऱ्या दिवशी 70 कोटींचं कलेक्शन केलं आहे. चित्रपटाच्या दोन दिवसांच्या एकूण कलेक्शनचा आकडा हा 127 कोटींवर गेला आहे. एका दिवसात 50 कोटींचा आकडा मोडून थेट 70 कोटींचा आकडा गाठवणारा हिंदीतील ‘पठाण’ हा पहिलाच सिनेमा ठरला आहे.
लाँग वीकेंडमुळे कमाईचा रेकॉर्ड
‘पठाण’ हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी रिलीज झाला आहे. तसेच 26 जानेवारीपासून सुट्टी असलेला लाँग वीकेंड आहे. त्यामुळे ओपनिंग वीकेंडला 150 ते 200 कोटींची कमाई करण्याची संधी ‘पठाण’ला आहे, असं आधीच सांगण्यात आलं होतं. तसेच जर सुरुवातीच्या 10 दिवसांमध्येच चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा पार केला तर त्यात आश्चर्य वाटायला नको.
बजेट
पठाण चित्रपटाचे बजेट सुमारे 250 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचे बजेट मोठे आहे आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला जवळपास दुप्पट कमाई करावी लागेल, तरच ती एक फायदेशीर गोष्ट असल्याचे सिद्ध होईल. एक प्रकारे शाहरुख खानची स्टार पॉवरही या चित्रपटातून दिसणार आहे.