kbc15
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील (Sony Entertainment Television) गेम शो ‘कौन बनेगा करोडपती – सीझन 15’ ला (Kaun Banega Crorepati) 5 सप्टेंबर रोजी त्यांचा पहिला करोडपती मिळाला आहे. जसकरण सिंह असं या विजेत्याचं नाव आहे. भारताच्या सीमेजवळ असलेल्या एका छोट्या गावातील जसकरणची कथा प्रेरणादायी आहे.
जसकरण हा 21 वर्षांचा तरुण कॉलेजला जाण्यासाठी 2 तासांचा प्रवास करतो. घरी परतल्यावर कॉलेजच्या अभ्यासाबरोबरच यूपीएससी तसेच केबीसीची तयारी देखील तो नियमितपणे करत होता. जेव्हा जसकरण महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसला, तेव्हा त्याच्या सगळ्या कष्टाचे आणि समर्पणाचे चीज झाले. केबीसीचा उत्कृष्ट होस्ट देखील जसकरणने या शोमध्ये आणलेल्या महत्त्वाकांक्षा आणि धैर्याच्या वावटळीस रोखू शकला नाही.
जसकरणने यावेळी खुलासा केला की त्याला शिक्षण घेता यावं यासाठी त्याचे कुटुंबीय त्याला एकत्रितपणे मदत करत होते. त्याची परतफेड तो केबीसीमध्ये मिळवलेल्या चमकदार यशाने करू इच्छित आहे. जिंकण्याच्या दुर्दम्य जिद्दीने झपाटलेल्या या फायरब्रँड तरुणाने सांगितलं की, त्याचा हा प्रवास चिकाटीचा होता. त्याची कहाणी ऐकताना आपल्याला जाणवते की, शिकण्याचे खरे धाडस शाळेच्या भिंतीपलिकडे सुरू होते.
एक आयएएस अधिकारी बनण्याची जसकरण सिंहची महत्त्वाकांक्षा आहे. क्विझ शो च्या या सीझनमध्ये ‘बदलावा’चे तत्व अधोरेखित करताना तो सांगतो, “केबीसीच्या अभ्यास सत्रांपासून ते 1 करोड रूपयांचा चेक मिळवण्यापर्यंतची झेप हे परिवर्तनाचे प्रतीक आहे. अमिताभ बच्चन सरांनी मला जोखीम पत्करण्यास प्रोत्साहित करणारे जीवनाचे धडे दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. ज्यांच्या पाठिंब्याने आणि सल्ल्याने मला हॉट सीटपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केले त्या माझ्या कुटुंबाचेही आभार.
जसकरण पुढे सांगतो की, हा विजय एका मोठ्या महत्त्वाकांक्षेचा केवळ श्रीगणेशा आहे. मला आयएएस अधिकारी म्हणून आपल्या देशाची सेवा करायची आहे. भविष्यकडे पाहताना मला या विजयाचा दुहेरी उद्देश दिसतो. कौटुंबिक आनंद सुरक्षित करणे आणि मी जिथे अभ्यास केला आहे त्या क्षेत्रांच्या शोधासाठी निधी उपलब्ध करणे. हे केवळ एक बक्षीस नाही तर माझे भविष्य घडवण्यासाठीची ही एक संधी आहे.”
‘कौन बनेगा करोडपती- सीझन 15’ हा शो दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहता येईल.