'पंचायत ४' केव्हा येणार ? IIFA पुरस्कार सोहळ्यात जीतू भैय्याने केला खुलासा
वेबविश्वामध्ये लोकप्रिय सीरीज म्हणून ‘पंचायत’ वेबसीरीजचा समावेश केला जातो. या सीरीजने कोरोना काळात प्रेक्षकांचं घरबसल्या निखळ मनोरंजन केलं आहे. ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’वर रिलीज झालेल्या ह्या सीरीजचे आजपर्यंत तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता लवकरच या सीरीजचा प्रेक्षकांच्या भेटीला चौथा सीझन येणार असल्याची माहिती आहे. या गाजलेल्या सीरीजचे आतापर्यंत तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. तिनही सुपरहिट सीझननंतर प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती चौथ्या सीझनची… अभिनेता जितेंद्र कुमारने ‘पंचायत’च्या चौथ्या सीझनबद्दल महत्वाचे अपडेट दिलेय.
युजवेंद्र चहलनंतर आता आणखी एका क्रिकेटरचा घटस्फोट? अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर होणार वेगळे?
नुकताच शनिवारी अर्थात ८ फेब्रुवारीला आयफा डिजीटल पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात जितेंद्र कुमारच्या ‘पंचायत’ वेबसीरीजला काही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या कॅटेगरीमध्ये, अभिनेता जितेंद्र कुमारला पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार तो घ्यायला आला होता, त्यावेळी अभिनेत्याला ‘पंचायत’च्या चौथ्या सीझनबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. अभिनेता म्हणाला की, “नुकतीच सीरीजची शुटिंग पूर्ण झाली आहे. सध्या ‘पंचायत ४’चं पुढील काम सुरु झालं आहे, मला आशा आहे की, लवकरच ही वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”
याशिवाय जितूने आयफा पुरस्कार सोहळ्याबद्दलही भाष्य केलंय. जीतू म्हणाला की, “मी ज्या राज्यात राहतो, अशा राजस्थानमध्ये आयफा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन होणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. राजस्थानमधील प्रेक्षकवर्गाकडून सर्व सिनेतारकांना खूप प्रेम मिळत आहे. आजवर इथल्या प्रेक्षकांनी कलकारांना भरभरुन प्रेम देत आले आहे. मी खात्री देतो की जयपूरचे लोक खरोखरच रत्ने आहेत.” असं अभिनेत्याने पुरस्कार सोहळ्यात विधान केलं. दरम्यान, आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘पंचायत ३’ वेबसीरीजला सर्वोत्कृष्ट वेबसीरीज, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाले आहे.
सस्पेन्स थ्रीलर ‘शातिर THE BEGINNING’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय