Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जिवाची होतिया काहिली’मध्ये उलगडणार मराठी आणि कानडी यांच्यातल्या प्रेमाची कहाणी

‘जिवाची होतिया काहिली’ (Jivachi Hotiya Kahili)  ही मराठी आणि कानडी यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत दोन दिग्गज अभिनेते आमनेसामने असणार आहेत. अस्सल कोल्हापुरी वेशात अभिनेते विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi) तर कानडी तडका द्यायला अभिनेते अतुल काळे (Atul Kale) असणार आहेत.

  • By साधना
Updated On: Jul 12, 2022 | 03:06 PM
jiwachi hotiya kahili

jiwachi hotiya kahili

Follow Us
Close
Follow Us:

सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनी प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करते आहे. आता या वाहिनीवर १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवी कोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ (Jivachi Hotiya Kahili)  ही मराठी आणि कानडी यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत दोन दिग्गज अभिनेते आमनेसामने असणार आहेत. अस्सल कोल्हापुरी वेशात अभिनेते विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi) तर कानडी तडका द्यायला अभिनेते अतुल काळे (Atul Kale) असणार आहेत.

[read_also content=”गुजरातमध्येही सतंतधार! आतापर्यंत ६३ जणांनी गमावला जीव https://www.navarashtra.com/india/continuous-in-gujarat-too-so-far-63-people-have-lost-their-lives-nrps-303366.html”]

मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पहिल्या झलकमध्ये प्रेमाला भाषा नसते हे दिसलं तर कानडी आणि मराठीचा झकास तडका दुसऱ्या वेळेस बघायला मिळाला. यात आकर्षण ठरलेत नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार. अर्थातच विद्याधर जोशी आणि अतुल काळे. हे दोन्ही दिग्गज कलाकार नव्या भूमिकांत, नव्या वेशात प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत.

बिनधास्त, स्वप्नाळू, चंचल अशी ही रेवथी!

पिरती दोघांची भाषेपलीकडची!
नवी मालिका – ‘जिवाची होतिया काहिली’.
18 जुलैपासून, सोम – शनि, संध्या. 7:30 वा.
सोनी मराठी वाहिनीवर. #जिवाचीहोतियाकाहिली। #JivachiHotiyaKahili#सोनीमराठी | #SonyMarathi#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati pic.twitter.com/BonwR7wmV0

— Sony मराठी (@sonymarathitv) July 11, 2022

विद्याधर जोशी यांचा अस्सल कोल्हापुरी वेश तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. आणि त्यातही त्यांच्यातलं होणारं चुरसदार भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना अवाक करत आहे. हे भांडण रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम करेल, या कलाकारांचं ऑनस्क्रीन चुरसदार भांडण, उडणारे खटके आणि त्यांचा स्वतःचा असा एक भाषेचा ठसका प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही. या दोघांमुळे रेवथी आणि अर्जुन यांची प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे.

या मालिकेत या दिग्गज कलाकरांबरोबर अभिनेत्री सीमा देशमुख आणि भारती पाटील यादेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांच्या जोडगोळीचं ऑन स्क्रीन चुरसदार भांडण १८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर ‘जिवाची होतिया काहिली’ या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

Web Title: Jiwachi hotiya kahili serial will be started from 18th july on sony marathi nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2022 | 03:05 PM

Topics:  

  • sony marathi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.