junior ntr
आरआरआर (RRR Movie) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप धुमाकूळ घालत आहे. अशात अभिनेता ज्युनियर एनटीआरने (NTR) सिनेरसिकांचे आभार मानले आहेत. “RRR च्या यशामध्ये तुम्हा रसिक मायबापांचा मोठा हात आहे. तुम्ही सिनेमावर प्रेम केलं नसतं तर आम्ही एवढं घवघवीत यश मिळवू शकलो नसतो. हा सिनेमा माझ्या आयुष्यातील खूप महत्वाचा सिनेमा आहे. या निर्व्याज प्रेमासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार”, असं त्यांनी म्हटले आहे. ट्विटवर त्याने एक मोठा संदेश शेअर केला आहे.
I’m touched beyond words… pic.twitter.com/PIpmJCxTly
— Jr NTR (@tarak9999) March 29, 2022
‘आरआरआर’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. कालही या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतात १९ कोटींची कमाई केली. तर काल दिवसभरात या सिनेमाने १७ कोटी कमावले आहेत. या सिनेमाची एकूण भारतातील कमाई ९१.५० कोटी इतकी आहे. तर RRR या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जगभरातील कमाईचे विक्रम मोडले आहेत. रविवारी RRRने ११८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची जगभरातील कमाई ही तब्बल ४९० कोटी रुपये इतकी झाली आहे.
[read_also content=”शेअर बाजारात तेजीचे सत्र, सेन्सेक्स आणि निफ्टीने घेतली ‘इतक्या’ अंकांची उसळी https://www.navarashtra.com/business/share-market-on-rise-sensex-up-by-654-points-nrsr-261731/”]
या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करत आहेत. शोले, नाचो नाचो,इत्थरा, राम राघव ही या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. या गाण्यांचं म्युझिक काळजात घर करतंय.