rrr chello show and kantara in oscars
ऋषभ शेट्टीच्या(Rishab Shetty) ‘कांतारा’ (Kantara) चित्रपटाला सगळीकडे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘कांताराच्या’ चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘आरआरआर’, ‘छेल्लो शो’नंतर ऑस्करच्या शर्यतीत कांताराची एन्ट्री झाली आहे. होंबाळे फिल्म्सने ऑस्करसाठी (Oscar Nomination For Kantara Movie) ‘कांतारा’ चित्रपट पाठवला होता. या चित्रपटाला सर्वोत्कष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता या दोन कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन(नामांकन) मिळाले आहे.
ऋषभ शेट्टीने या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून तोच या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी माहिती दिली आहे की, ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता या दोन कॅटेगरीमध्ये नामांकनासाठी पात्र ठरवण्यात आलं आहे. याचा अर्थ असा की, हा चित्रपट ऑस्कर मेंबर्सच्या मेन नॉमिनेशनद्वारे पुढे जाण्यासाठी मत मिळवण्यासाठी पात्र आहे.
चित्रपटगृहात 100 दिवस पूर्ण, उशीरा उतरला शर्यतीत ‘कांतारा’
वास्तविक ‘कांतारा’ तसा ऑस्करच्या शर्यतीत उशीरा उतरला. ‘आरआरआर’सोबत या चित्रपटाची तगडी स्पर्धा होती. आता फायनल नॉमिनेशनमध्ये ‘कांतारा’ला स्थान मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.‘कांतारा’हा 2022 मधील सर्वाधिक कमाई केलेला सिनेमा आहे. या चित्रपटाने ग्लोबल स्तरावर 400 कोटींपेक्षा जास्त रकमेची कमाई केली आहे. नुकतेच या चित्रपटाला चित्रपटगृहात 100 दिवस पूर्ण झाले. होंबाळे फिल्म्सकडून 2023 च्या ऑस्करसाठी ‘कांतारा’ला पाठवण्यात आलं होतं. आता याला दोन कॅटेगरीमध्ये नामांकनाचा मार्ग खुला झाला आहे.
We are overjoyed to share that ‘Kantara’ has received 2 Oscar qualifications! A heartfelt thank you to all who have supported us. We look forward to share this journey ahead with all of your support. Can’t wait to see it shine at the @shetty_rishab #Oscars #Kantara #HombaleFilms
— Hombale Films (@hombalefilms) January 10, 2023
होंबाळे फिल्म्सने (Hombale Films) याविषयी माहिती देताना म्हटले की,“आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की ‘कांतारा’ला ऑस्करमध्ये दोन कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. आम्हाला सपोर्ट करणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. यापुढच्या प्रवासातही तुमची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे.”
[read_also content=”विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं T-20 क्रिकेटमधलं करिअर संपलं?, BCCIच्या सूत्रांनी काय दिले संकेत? https://www.navarashtra.com/sports/bcci-decision-about-virat-kohi-and-rohit-sharma-nrsr-360629/”]
पौराणिक कथेचा आधार
ऑस्करसाठी वोटींग 11 जानेवारीपासून 17 जानेवारीपर्यंत सुरु राहील. शेवटचं नॉमिनेशन 24 जानेवारीला होणार आहे. ‘कांतारा’चित्रपट कर्नाटकातील भूत कोला आणि देवांविषयीची पौराणिक कथेवर आधारित आहे. चित्रपटामध्ये सप्तमी गौडा, अच्युत कुमार आणि प्रमोद शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ऋषभ शेट्टी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. ‘केजीएफ : चॅप्टर 2’ आणि ‘777 चार्ली’नंतर ‘कांतारा’ सिनेमाचा कन्नड सिनेमा पुढे नेण्यात या चित्रपटाचा मोठा वाटा आहे.