२५ वर्षानंतर मायदेशी परतली ममता कुलकर्णी! मुंबई एअरपोर्टवर येताच झाली भावुक; व्हिडीओ व्हायरल
शाहरुख खान आणि सलमान खानच्या ‘करण अर्जुन’ चित्रपटातील अभिनेत्री ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर भारतात परतली आहे. तिने भारतात परतल्यानंतर आपल्या भावना शेअर केल्या आहेत. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर भावूक व्हिडिओ शेअर केली आहे. ममताने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत जवळपास २४ वर्षानंतर ती मायदेशी परतणार असल्याचं तिने म्हटलं आहे.
पुनर्जन्माची कथा, गूढ रहस्य… संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकरच्या ‘रुखवत’चा थरारक ट्रेलर लाँच…
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ममता कुलकर्णी म्हणते, “नमस्कार मित्रांनो, मी ममता कुलकर्णी… नुकतीच मी भारतात परतली आहे. सध्या मी मुंबईमध्ये आहे. तब्बल २५ वर्षांनंतर मी मायदेशी परतले आहे. भारतात परतल्यानंतर माझ्या काही आठवणी जाग्या झाल्या आहेत. मी २००० या वर्षी भारत सोडून परदेशात स्थायिक झाले. आता अनेक वर्षांनंतर मी भारतात आल्यामुळे मी भावूक झाले आहे. मी माझ्या भावना शब्दातून नाही सांगू शकत. जेव्हा माझं विमान भारतात उतरत होतं, त्यावेळी देशाचा झालेला कायापालट पाहून मी भारावले.”
“मी २५ वर्षांनंतर भारतात आलेय. माझं विमान उतरत असताना मी आजुबाजूला पाहिलं त्यावेळी देशाची झालेली प्रगती पाहून मला खूपच आनंद झाला. मुंबई विमानतळाच्या बाहेरील दृश्य पाहून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.” अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली. ९० च्या दशकात बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णीची चाहत्यांमध्ये फार मोठी क्रेझ होती. ‘तिरंगा’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्रीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले. ममता चाहत्यांमध्ये फक्त आपल्या अभिनयामुळेच नाही तर, सौंदर्यामुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली.
कारच्या नंबर प्लेटवरून उघड झाले रहस्य! ‘सिकंदर’मध्ये सलमान खान साकारणार ही भूमिका
ममता कुलकर्णी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कमालीची चर्चेत राहिली आहे. अंडरवर्ल्ड छोटा राजनबरोबर तिचं नाव जोडलं गेलं होतं. २००२ साली ममताने ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीबरोबर लग्नागाठ बांधली. लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर ममता पतीबरोबर केनियाला स्थायिक झाली होती. त्यानंतर अभिनेत्री ममता कुलकर्णी बॉलिवूडमधून गायब झाली. अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी ममता आणि तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यशाच्या शिखरावर असताना अचानक तिच्या करिअरला उतरती कळा लागली. त्यानंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली. ममताने ‘तिरंगा’ शिवाय, ‘आशिक’, ‘आवारा’, ‘क्रांतिवीर’, ‘वक्त हमारा हैं’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘करण अर्जुन’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.. तिला इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूडमधील रिजेक्शन क्वीन म्हटलं जायचं, कारण तिने अनेक चित्रपटांची ऑफर धुडकावून लावली होती.