गेल्या एक वर्षापासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेली अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor)आता लवकरच ओटीटी मधून पदार्पण करणार आहे. तीचा सिनेमा जानेजान प्रदर्शनास सज्ज असून ती सध्या विविध कामात व्यस्त आहे. या दरम्यान करिनाने नुकतंच अभिनेत्री करीना कपूरने मुंबईतल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात राष्ट्रगीत(National Anthem) सुरू असताना तिच्याकडून मोठी चूक झाली. करीनाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नेमकं काय घडलं कार्यक्रमात ज्यामुळे करीनाला ऐवढं ऐकावं लागत आहे, जाणून घ्या.
[read_also content=”मोरक्को नतंर आता लिबियावर संकट! डॅनियल वादळाने केला कहर, 2000 हून अधिक मृत्यूची भीती, देशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर https://www.navarashtra.com/world/at-list-2000-died-in-libya-due-to-daniel-storm-and-flood-nrps-456891.html”]
काल मुंबईत एका कार्यक्रमात अभिनेत्री करिना कपूर खाननं हजेरी लावली होती. या कार्यक्रमात करीनाने लाल रंगाची शॉर्ट कुर्ती आणि धोती स्कर्ट परिधान केला होता. त्यावेळी तीने दीपप्रज्वलन केलं. त्यानंतर सगळ्यांनी उभं राहून राष्ट्रगीत गायलं. हे राष्ट्रगीत सुरु असताना प्रथम ती सावधान मुद्रेत उभी होती. परंतु, त्यानंतर तिने दोन्ही हात बांधले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल करण्यास सुरुवात केली.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युझरने कंमेट केलं की, ‘हिला कोणीतरी सांगा की राष्ट्रगीत सुरू असताना सावधान मुद्रामध्ये उभं राहायचं असतं, हात पकडून नाही’, तर ‘राष्ट्रगीत हे सावधान स्थितीतच म्हटलं जातं. स्वत:ला मोठे स्टार म्हणणाऱ्यांकडून अशी चूक अपेक्षित नाही’, असं म्हणत दुसऱ्या युजरने सुनावलं.
सध्या करिनाचा आगामी जाने जान सिनेमा येत्या 21 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलिज होणार आहे. यामध्ये करिना कपूरसह
अभिनेता विजय वर्मा आणि जयदीप अहलावत मूख्य भूमिकेत आहे. ‘जाने-जाने’ हे एक मर्डर मिस्ट्री आहे ज्यात करीना सिंगल मदरची भूमिका साकारत आहे जी एका खून प्रकरणात संशयित आहे. जयदीप अहलावत करिनाच्या शेजाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे तर विजय वर्मा तपास पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.