फोटो सौजन्य - Social Media
लोकप्रिय रॅपर आणि गायक किंग, ज्याच्या ‘तू मान मेरी जान’ या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली, तो आता अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करतो आहे. Amazon Prime Video ने त्यांच्या नवीन ओरिजिनल वेब सीरिज ‘लु्ख्खा’ मधून किंगचा अॅक्टिंग डेब्यू होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही माहिती Prime Video India चे डायरेक्टर आणि ओरिजिनल कंटेंट प्रमुख निखिल माधोक यांनी दिली आहे.
‘लु्ख्खा’ ही सीरिज तरुण पिढीला आकर्षित करणारी असून, यात संगीत, अॅक्शन आणि युथ-सेंट्रिक कथा यांचा समावेश आहे. ही एक मल्टी-जॉनर सिरीज असून, येणाऱ्या वयातील संघर्ष आणि उर्जा यावर आधारित आहे. किंगची अनोखी शैली आणि त्याचा म्युझिकल टच या सीरिजमध्ये विशेष रंगत आणणार आहे. ही कल्पना दोन नवोदित लेखकांनी सादर केली असून, तेच या सीरिजचे लेखक आणि निर्माते देखील आहेत. माधोक म्हणाले, “किंगचा अभिनय यात पाहायला मिळणार आहे आणि आम्हाला या नव्या लेखकांसोबत काम करून खूप सकारात्मक अनुभव मिळाला आहे. आम्ही भविष्यातील प्रोजेक्ट्सवरही विचार करत आहोत.”
किंगने अलीकडेच आपल्या अल्बम ‘शायद कोई ना सुने’ मधील तिसरे गाणे ‘ये जिंदगी है’ रिलीज केले आहे. हे गाणं एका भावनिक प्रसंगावर आधारित असून, त्याचे शब्द अगदी थेट मनाला भिडणारे आहेत.” हे गाणं त्याने स्वतः लिहिले, गायलं आणि कंपोझ केलं आहे. संगीत भर्ग यांचं असून मिक्सिंग हनीश तनेजा यांनी केलं आहे.
2019 मध्ये MTV Hustle या रिअॅलिटी शोमुळे किंग आणखीन नावारूपास आला. जरी तो शो जिंकू शकला नाही, तरी ‘गुमशुदा’, ‘माहौल’, ‘ऐ जानी’ यांसारख्या गाण्यांनी त्याने चाहत्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. नंतर त्याने ‘तु आके देख ले’, ‘मान मेरी जान’, ‘कोडॅक’ यांसारखी गाणी देत संगीत क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली. ‘लु्ख्खा’ ही सीरिज किंगच्या चाहत्यांसाठी एक नवा अनुभव ठरेल. या शोची संपूर्ण कलाकार यादी आणि प्रीमियरची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.