Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सनी’ चित्रपटात पाहायला मिळणार क्षिती जोग आणि ललित प्रभाकरची अनोखी केमिस्ट्री

क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’(Sunny) हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ललित प्रभाकर(Lalit Prabhakar), क्षिती जोग (Kshiti Jog) यांच्यासह चिन्मय मांडलेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे.

  • By साधना
Updated On: Oct 29, 2022 | 08:10 PM
kshiti jog in sunny

kshiti jog in sunny

Follow Us
Close
Follow Us:

बिनधास्त, आत्मविश्वासू, स्पष्टवक्ती अशी वैदेही ‘सनी’मधून (Sunny) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैदेहीची भूमिका क्षिती जोग (Kshiti Jog) साकारणार असून यात तिला जिगरवाली बाई असं म्हणण्यात आलं आहे. कॅफे मालक असलेली वैदेही सनीसोबत कधी कठोर वागताना दिसत आहे, तर कधी त्याची काळजीही घेताना दिसत आहे. सनी आणि वैदेहीमध्ये कामासोबतच भावनिक नातं निर्माण झाल्याचेही दिसतेय. त्यांच्या नात्यातील नेमकी गंमत ‘सनी’ पाहिल्यावरच उलगडेल.

दरम्यान या दोघांमधील केमिस्ट्री पडद्यावर उत्तम दिसत आहे. क्षिती जोग (Kshiti Jog) आणि ललित प्रभाकरने (Lalit Prabhakar) नाटक आणि मालिकेमध्ये एकत्र काम केले आहे. ‘सनी’च्या निमित्ताने क्षिती आणि ललित आता चित्रपटातही एकत्र दिसणार आहेत.

यापूर्वी क्षिती जोग आपल्याला ‘झिम्मा’ चित्रपटात दिसली. त्यात मिता जहांगिरदार ही व्यक्तिरेखा साकारणारी क्षिती यात थोडी गोंधळलेली, घाबरट अशी दिसली. मितावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आता या भूमिकेच्या अगदी विरूद्ध अशी ‘सनी’मधील तिची भूमिका आहे आणि ही भूमिकाही तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.

क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ललित प्रभाकर, क्षिती जोग यांच्यासह चिन्मय मांडलेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.

Web Title: Kshiti jog to work with lalit prabhakar in suny nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2022 | 08:08 PM

Topics:  

  • kshiti jog

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.