aamir khan and kiran rao
निर्माता- दिग्दर्शक किरण राव तिच्या आगामी ‘लापता लेडीज’ (Laapata Ladies) या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) सोबत ‘लापता लेडीज’चा (Laapata Ladies Teaser) पहिला टीझर ११ ऑगस्ट रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘धोबी घाट’नंतर आता ‘लापता लेडीज’ हा किरण रावने दिग्दर्शित केलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मातीही किरण राव आहे.
[read_also content=”गाविलगड किल्ल्यात पुन्हा वाघाचे दर्शन ! वन अधिकाऱ्यांच्या कॅमेऱ्यात अविस्मरणीय क्षण कैद https://www.navarashtra.com/maharashtra/sighting-of-a-tiger-again-in-gavilgarh-fort-unforgettable-moments-captured-on-camera-by-forest-officials-nraa-313848.html”]
‘लापता लेडीज’ मध्ये दोन तरुण नववधू ट्रेनमधून हरवल्यावर उडालेल्या गोंधळाची कथा मांडण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार २००१ मधल्या ग्रामीण पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारित आहे.
चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन, छाया कदम यांचा समावेश आहे आणि दोन अतिशय प्रतिभावान तरुण अभिनेत्रींना वधूच्या भूमिकेत लॉन्च करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप त्यांच्या नवीन प्रमुख अभिनेत्रींची नावे जाहीर केलेली नाहीत.
हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन आणि किंडलिंग प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. याची पटकथा, बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे. पटकथा आणि संवाद स्नेहा देसाई यांनी लिहिले आहेत आणि अतिरिक्त संवाद लेखन दिव्यानिधी शर्मा यांनी केले आहे.