फोटो सौजन्य: Social Media
चित्रपट पाहणे कोणाला नाही आवडत. आपल्याकडे लहानग्यांपासून ते थोरांपर्यंत सर्वच जण हे चित्रपट प्रेमी असतात. त्यात ही चित्रपट भयपटाच्या वर्गात मोडत असेल तर सगळे चिडीचूप. भयपटांची नेहमीच एक क्रेझ भारतात दिसून आली. जर एखाद्या चित्रपटात उत्तम कथानक आणि भयभीत करणारे सीन्स असतील तर रसिकप्रेमी नक्कीच त्या चित्रपटांना दाद देतात. पाहूयात अशा काही भयपटांबद्दल, जे तुम्ही नक्कीच पाहिले पाहिजे.
पूजा सावंतच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट खूप कमी जणांना ठाऊक आहे. दिग्दर्शक विशाल फुरीयानी या चित्रपटाचे उत्तमरीत्या दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट तुम्हाला नक्कीच घाबरवून सोडेल यात काही वाद नाही. तुम्हाला हा चित्रपट Zee5 वर पाहायला मिळेल.
ही एक क्लासिक इंडियन हॉरर फिल्म आहे ज्याचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले होते. आजही ते Zee5 वर उपलब्ध आहे. हा चित्रपट शर्मा कुटुंबावर आधारित आहे जिथे त्यांची मोठी मुलगी मिनी (रेवती) नवीन घरात शिफ्ट झाल्यावर तिची प्रकृती बिघडते. यानंतर तिला मानसिक आरोग्याच्या समस्या सुरू होतात. कधी कुटुंबावर जीवघेणा हल्ला होतो तर कधी विचित्र घटना घडू लागतात. नंतर कळते की या घरातच काहीतरी गडबड आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारी १९९२ रोजी प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटामुळे तुमच्या अंगावर शहरे येऊ शकतात, एवढी उत्तम या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात सुष्मिता सेन आणि जेडी चक्रवर्तीसारखे कलाकार आहेत. ही कथा खन्ना कुटुंबाबद्दल दाखवली आहे जिथे ते त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होतात. परंतु लवकरच त्यांना भीतीदायक घटनांना सामोरे जावे लागते. हा चित्रपट तुम्हाला YouTube वर पाहायला मिळेल.
आर माधवन दिग्दर्शित हा एक तमिळ भाषेतील हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. शैतानमध्ये जसा आर माधवनचा अवतार दिसला तसाच या चित्रपटातही त्याची ऍक्टिंग तुम्हाला प्रभावित करेल. हा चित्रपट डिज्नी+हॉटस्टारवर उपलब्ध आहे.
स्वाती (उर्मिला मातोंडकर) आणि विशाल भाटिया (अजय देवगण) यांच्या अभिनयाने हा सिनेमा सजला आहे. ही कथा एका अपार्टमेंटची आहे, जिथे आधीच्या भाडेकरूचा आत्मा राहत असतो. त्यामुळेच या अपार्टमेंटमध्ये विचित्र गोष्टी घडायला सुरुवात होते. हा चित्रपट तुम्ही ऍमेझॉन प्राइमवर पाहू शकतात.