mahesh manjrekar and randeep hooda
सध्या अनेक देशभक्तांवरचे चित्रपट येत आहेत. अशातच स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट म्हणजेच बायोपिक (Biopic On Veer Savarkar) बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सरबजीत या चित्रपटात काम करणारा अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सावरकरांची भूमिका साकारणार आहे. सावरकरांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) करणार आहे.
[read_also content=”मुंबई इतक्यात मास्क फ्री नाहीच! विना मास्क कारवाईसाठी आता BMC नवी एजन्सी नेमणार https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-is-not-so-mask-free-bmc-will-now-appoint-a-new-agency-for-non-mask-action-nrvk-259090.html”]
सावरकरांची भूमिका साकारण्याचं मोठं आव्हान आता रणदीपसमोर आहे. मात्र ज्या कामामध्ये जीव ओतावा लागतो असं कामच स्वीकारावं अशी भूमिका या चित्रपटासंदर्भात बोलताना रणदीपने मांडली आहे. रणदीपचं सध्या नेटफ्लिक्सवरील ‘एक्स्ट्रॉर्शन’ या चित्रपटासाठी कौतुक होत आहे. विशेष म्हणजे आता सावरकरांवरील चित्रपटाची निर्मितीही ‘सरबजीत’ चित्रपटाचे निर्मातेच करणार आहे. या चित्रपटामधील सावरकरांच्या भूमिकेसाठी शरीरयष्टी आणि सर्वच बाबतीत रणदीप अगदी उत्तम आहे, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.
“सध्या त्या कथा सांगण्याची उत्तम वेळ आहे ज्यांच्याकडे यापूर्वी आपण कानाडोळा केला होता. वीर सावरकरांच्या आयुष्यावरील चित्रपटाची कथा ही एक उत्साहाने भरलेली कथा असेल. आपण आपला इतिहास पुन्हा पाहावा यासाठी ही कथा प्रेरणादायी ठरेल,” असं महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे. “आम्ही या चित्रपटावर काम सुरु केलंय हे सांगताना मला फार आनंद होत आहे. चित्रपटाच्या पटकथेचं काम जवळवजळ पूर्ण होत आलंय. लवकरच या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे,” असं महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
Kuch kahaniyaan batayi jaati hai aur kuch jee jaati hain!
Grateful, excited and honoured to be part of #SwatantraVeerSavarkar‘s biopic ✨@manjrekarmahesh @anandpandit63 @thisissandeeps @apmpictures @directorsamkhan @pandya_jay #RoopaPandit #LegendStudios pic.twitter.com/V6iXF5GHtr— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) March 23, 2022
भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील एका महत्वाच्या व्यक्तीची भूमिका साकारण्याची संधी मिळत असल्याने रणदीप फारच आनंदात आहे. “असे अनेक नायक आहेत ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठी भूमिका पार पाडली होती. मात्र त्यांच्या कामाचं तितकं कौतुक झालं नाही. त्यांच्या कथा खरोखरच सांगितल्या गेल्या पाहिजे,” असं मत रणदीपने व्यक्त केलं आहे.