मुलगी झाली हो...! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी झाले दुसऱ्यांदा आई- बाबा...
झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या लोकप्रिय मालिकेतून खुशबू तावडे हिला महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी मिळाली आहे. सध्या अभिनेत्री खासगी लाईफमुळे चर्चेत आली आहे. खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा आई- बाबा झाले असून त्यांना आता कन्यारत्न झाला आहे. अभिनेत्रीने आज एका गोंडस मुलीला जन्म दिला असून अभिनेत्रीवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
हे देखील वाचा – थलपथी विजयच्या चित्रपटात बॉबी देओल करणार धमाका, निर्मात्यांनी केली ब्लॉकबस्टर घोषणा!
‘लोकमत फिल्मी’ने दिलेल्या माहितीनुसार, खुशबू दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिला पहिला मुलगा असून त्याचं नाव राघव आहे. खुशबू आणि संग्रामने २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली आहे. दोघंही पेशाने मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत. त्यांना लग्नानंतर तीन वर्षांनी पहिला मुलगा झाला. २ नोव्हेंबर २०२१ रोजी अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला. त्याचं नाव त्यांनी राघव असं ठेवलं. आता त्यानंतर दुसऱ्यांदा अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिलेला आहे.
खुशबू तावडे ऑगस्ट महिन्यात ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतून प्रेग्नेंसीमुळे बाहेर पडली होती. तिने मालिकेत उमा खोतची भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या उमाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंदीस पडली. तिच्या ऐवजी मालिकेत काही दिवस उमाची भूमिका अभिनेत्री पल्लवी वैद्यने साकारली होती. त्यानंतर काही दिवसांनी ह्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.