(फोटो सौजन्य- Social Media)
मराठी चित्रपटसृष्टीत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जाहीर करण्यात आले आहे. ज्यामध्ये अनेक मराठी दिग्गज कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. मराठी अभिनेते शिवाजी साटम यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार मिळवला आहे. याचदरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हा जेष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन. चंद्रा यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली आहे. त्यांनी या सगळ्या कलाकारांचे आभार मानले आणि लिहिले की, ‘या सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचं हार्दिक अभिनंदन. राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य आणि उदंड यश द्यावं,’ अशा शुभेच्छा मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.
चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुढील पुरस्कार जाहिर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेते श्री.शिवाजी साटम यांना आणि स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ… — Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) August 14, 2024
अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्म 21 एप्रिल 1950 रोजी झाला. या अभिनेत्याने रंगभूमी, टेलिव्हिजन आणि मोठ्या पडद्यावर काम करून आपला चाहत्या वर्गावर प्रभाव टाकला. ‘सीआयडी’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आणि प्रेक्षकांना ती खूप आवडली. या मालिकेला त्यांच्या प्रचंड प्रतिसाददेखील मिळाला. अभिनेता अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी बँकेत निकरी करत असे. मात्र त्यांना आधीपासूनच रंगमंचाची आवड होती. इंटर बँक स्टेज स्पर्धेतून त्यांना पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन बाळ धुरी यांनी शिवाजी साटम यांना संगीत नाटकात मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी मालिकेत आणि चित्रपटांमध्ये काम केले. आणि त्यांचा अभिनय हा प्रेक्षकांपर्येंत पोहचला.
तसेच, अभिनेत्री आशा पारेख यांनी त्यांच्या कारकिर्दीत दमदार चित्रपट केले असून हे सगळे चित्रपट चित्रपटगृहात ब्लॉकब्लस्टर ठरले आहेत. ‘जब प्यार किसी से होता है’, ‘तिसरी मंजील’, ‘दो बदन’, ‘कन्यादान’, ‘कटी पतंग’, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
हे देखील वाचा- काय असेल ‘फॅशन 2’ ची कथा? दिग्दर्शक मधुर भांडारकरने चित्रपटाबद्दल केला खुलासा!
यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची आणि बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांची समिती या पुरस्कारांची शिफारस करत असतात. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.