(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
कलर्स मराठी वाहिनीवरील रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सध्या चर्चेत आहे. या शोने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड मोडले असून, हा शो बिग बॉस प्रेमींना खूप आवडत आहे. तसेच या घरामध्ये स्पर्धकांचा चौथा आठवडा मोठ्या थाटात सुरु आहे. गेल्या मागच्या तीन आठवड्यात घरात दोन गट झाले असून दोन्ही गटांची उत्तम खेळी ‘बिग बॉस’प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. तीन आठवड्यातच घरातील सदस्यांमध्ये मैत्रीचं आणि बहिण भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. परंतु, आजच्या भागात अभिजीतमुळे अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली पाहायला मिळणार आहे.
निक्कीने विचारला अभिजीतला प्रश्न
कलर्स मराठी वाहिनीने नुकताच बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा प्रोमो त्यांच्या अकाउंटवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आणि घन:श्याममध्ये भांडण झालेले पाहायला मिळाले. या प्रोमोमध्ये अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली दिसून येत आहे. प्रोमोमध्ये निक्की अभिजीतला विचारते की, “तुला वाटतं का की मी मनापासून माफी मागत नाही.” त्यावर अभिजीत लगेच उत्तर देतो, “हा तू मनापासून माफी मागते.” निक्की अभिजीतसोबत बोलल्याने अरबाजचा राग अनावर झाला आहे.
हे देखील वाचा- रक्षाबंधनाच्या दिवशी निक्की आणि घन:श्याममध्ये वाद, भावा बहिणीच्या नात्यात पडली फूट!
अरबाजला आला राग
प्रोमोमध्ये दिसत आहे निक्की अभिजीतशी बोलायला गेल्यामुळे अरबाजला राग येतो. तो निक्कीला तू भवऱ्यासारखी फिरते असे बोलतो. ते ऐकून निक्कीला देखील राग येतो आणि ती भडकते अरबाजला लांब करते. अरबाज देखील प्रचंड चिडतो. आता अभिजीतमुळे निक्की-अभिजीतमध्ये झालेली ही भांडण मिटतील का? याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी कोणामध्ये वाद होईल हे सांगू शकत नाही. या दोघांच्या खास मैत्रीमध्ये देखील फूट पडेल का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.