(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मंगळवारी (२२ एप्रिल) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला आहे. पहलगामतील या हल्ल्यात किमान २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे आणि लोक सोशल मीडियाद्वारे आपला राग आणि संताप व्यक्त करत आहेत. सर्व देशवासीयांप्रमाणे, मराठी कलाकारही या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दिसत आहेत. आणि आता अश्यातच मराठी अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हीने लोकांना विचारात पडणारी पोस्ट शेअर केली आहे. जी आता इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.
केतकी माटेगावकरने पोस्टद्वारे व्यक्त केला संताप
मराठी अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल पोस्ट करताना तिने लोकांना प्रश्न विचारला आहे. ‘अनेक प्रश्न! कोणी द्याल का उत्तर?’ असं कॅप्शन लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. आता या पोस्टला चाहत्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. लोक अभिनेत्रीच कौतुक करताना दिसत आहेत.
काय म्हणाली केतकी माटेगावकर?
केतकी पोस्ट शेअर करून अनेकांना भावुक केले आहे. तिने लिहिले की, ‘निःशब्द! किती वेळा राग व्यक्त करून स्वतःच शांत करायचे स्वतःला? किती वेळा RIP लिहायचे आपल्याच लोकांसाठी आणि का??? किती दिवस चालणारे हे? किती वेळा आपल्या निर्दोष लोकांचा बळी जाणार? आणि हे शेजारी फक्त हात वर करणार की आम्ही काही केलं नाही? किती वेळा???? बास ना आता! बास! गोळ्या आणि बंदुका बनवण्या पेक्षा योग्य शिक्षणात तुमच्या देशाच्या लोकांना घडवा! त्यांना जरा माणुसकी शिकवा! धर्माच्या नावाखाली काहीही करताय ते बास करा आता! त्रास देणे मारणे हे एवढच आयुष्य आहे का हो तुमचं? मुळात ज्या देवाला मानता, किंवा जिथे spirituality / अध्यात्म येतं तिथे मारहाण, अत्याचार, हिंसा कशी असू शकते? अध्यात्म आणि धर्म ह्या दोन गोष्टी एकत्र करून त्याला कसही वापराल का? कुठल्याही धर्मात अध्यात्म तुम्हाला देहबुद्धी सोडायला शिकवतं! आणि इथे निर्दोष देहांची विटंबना??? काय हे????,’ असं अभिनेत्रीने लिहून लोकांना विचार करायला भाग पडतील असे प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच शेवटी तिने ‘एक भारतीय एक हिंदू’ असे लिहिले आहे.
पहलगाममध्ये काय घडले?
मंगळवारी पहलगाममध्ये एक हृदयद्रावक दहशतवादी हल्ला झाला. जिथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. यामध्ये २ परदेशी पर्यटकही होते. या घटनेने पुन्हा एकदा भारताला पुलवामा दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली आहे. यावेळी संपूर्ण देश संतापाने पेटला आहे. केंद्र सरकारही पूर्ण सक्रिय आहे. घटनेनंतर लगेचच गृहमंत्री अमित शहा काश्मीरमध्ये पोहोचले आणि सुरक्षा दलांसोबत सतत बैठका घेत आहेत. या घटनेचा निषेध करताना, पंतप्रधान मोदींनी हे देखील स्पष्टपणे सांगितले की ते या घडलेल्या घटनेसाठी माफ करणार नाहीत.
पहलगाम हल्ल्यानंतर Vaani Kapoor का झाली ट्रोल? सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केली टीका!
केतकी माटेगावकरची कारकीर्द
केतकी माटेगावकर ही एक मराठी अभिनेत्री आणि गायिका आहे. केतकीने स्वतःच्या कारकीर्द ‘शाळा’ या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आणि या नंतर तिने ‘टाईमपास’, ‘तानी’ आणि ‘फुंतरु’ यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट तिने दिले आहे. तसेच अभिनेत्री एक शास्त्रीय गायिका देखील आहे. तिला लहानपणापासूनच गायनाची आवड आहे.