फोटो सौजन्य - social media
“महाराष्ट्राची हास्य जत्रा” या मराठी कॉमेडी मालिकेतून प्रसिद्ध झालेली महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री नम्रता संभेरावने तिच्या चाहत्यांना इंस्टाग्राम पोस्टवरून एक खुशखबर दिली आहे. त्या पोस्टमध्ये तिने जुन्नर येथे बांधलेल्या तिच्या नव्या शेतघराचा फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या वर्षात अनेक मराठी कलाकारांनी त्यांनी त्यांच्या स्वप्नात पाहिलेला बंगला अस्तित्वात आणला आहे. प्रसाद ओक, मंगेश देसाई, अदिती द्रविड, अश्विनी महांगडे, रुपाली भोसले या सगळ्या कलावंतांनी यंदाच्या वर्षी त्यांच्या नवीन घरात गृहप्रवेश करत ते फोटो चाहत्यांना सोशल मीडिया मार्फत शेअर केले.
सोशल मीडियावर ३ फोटो शेअर करत नम्रताने तिच्या कष्टाचं चीज म्हणजेच तिच्या नव्या घराबद्दल लोकांना सांगितलं आहे. तिच्या या आनंदाच्या क्षणी, चाहत्यांकडून कॉमेंट्समध्ये भरपूर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे, प्रसाद खांडेकर, श्रेया बुगडे सारख्या अनेक कलावंतांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. अवघी महाराष्ट्राची हास्य जत्राच कॉमेंट्समध्ये अवतरलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
नम्रताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये नम्रता सोबत तिचे पती योगेश संभेराव दिसत आहेत. ज्यात ते दोघे त्यांच्या तूमुकदार शेतघरासमोर डौलाने उभे आहेत. फोटोत इतरांच्या चेहऱ्यावर हासू आणणाऱ्या नम्रताच्या चेहऱ्यावरचा तेज काही औरचं दिसत आहे. दुसऱ्या फोटोत जोडप्यासोबत त्यांच्या मुलगा रुद्रराज सत्यनारायणाला ओवाळताना दिसत आहेत. नम्रता आणि योगेश यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्या परिश्रमाची कथा सांगत आहे. तर तिसऱ्या फोटोत नम्रता जोडीने गृहप्रवेशाची पूजा करताना दिसत आहे.
“गणपती बाप्पा मोरया! आमचं शेतीघर… स्वत:वर नेहमी विश्वास ठेवा मग सर्वकाही शक्य होतं. तुम्हाला प्रेमाची साथ असेल तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात… #नवीनघर #सेकंडहोम,” काही अशा प्रकारे कॅप्शनमध्ये नम्रताने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्याला पोट धरून, खळखळून हसवणाऱ्या नम्रताचे आणि संभेराव कुटुंबियांचे नवराष्ट्र कडून मनःपूर्वक अभिनंदन!