
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र लग्नसराईला सुरूवात झाली आहे. सध्या मनोरंजनसृष्टीकत देखील लगीनघाई पाहायला मिळत आहे. एक पाठोपाठ एक कलाकार लग्नबंधणात अडकताना दिसत आहेत. अशात आता अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या घरीही लगीनघाई पाहायला मिळत आहे. तेजस्विनीच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. नुकताच तिचा मेहंदीचा सोहळा पार पडला आहे.
तेजस्विनी लोणारीने मेहंदी समारंभात जांभळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. यात तिने मोकळे केस मिनिमल मेकअप यात तिचे सौंदर्य खुललं होते. तेजस्विनीच्या हातावर समाधान सरवणकर यांच्या नावाची मेहंदी लागली आहे. मेहंदी सोहळ्यासाठी फुलांचे डेकोरेशन करण्यात आले होते. तेजस्विनी हाता पायावर सुंदर मेहंदी काढली आहे. सध्या तिच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पोस्टवर चाहते आणि कलाकार तेजस्विनीला तिच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.
तेजस्विनी लोणारी सरवणकरांची सून होणार आहे. ती शिंदेंच्या शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. लवकरच तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरूवात करणार आहेत. सध्या तिच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
तुझेच मी गीत गात आहे, देवमाणूस अशा मालिकांमधून तिने लोकप्रियता मिळवली आहे. तेजस्विनीने ऑक्टोबर महिन्यात समाधान यांच्याशी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. या दोघांचा मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाहसोहळा पार पडणार आहे.
मंदार शिंदे यांच्या ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा नुकतीच तिची दहावी झाली होती. पहिल्याच चित्रपटात तेजस्विनीने जितेंद्र जोशीच्या हिरोइनची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीसोबतच तेजस्विनी निर्मातीसुद्धा आहे.