Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती; शरद पवारांची टिका

सध्या आम आदमी पक्ष आणि भाजपा यांच्यात केजरीवाल यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपटावर केलेल्या भाष्यावरून विवाद सुरूच आहे तो पर्यंत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 01, 2022 | 02:59 PM
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती; शरद पवारांची टिका
Follow Us
Close
Follow Us:

सध्या दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रींचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे. मात्र त्यावरून राजकारणही तापताना दिसत आहे. सध्या आम आदमी पक्ष आणि भाजपा यांच्यात केजरीवाल यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपटावर केलेल्या भाष्यावरून विवाद सुरूच आहे तो पर्यंत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावर आता भाजपाही चांगलीच संतापलेली दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर , ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा आधार घेत भाजप गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत असल्याचा अत्यंत गंभीर आरोप गुरुवारी केला. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरे सोडावे लागले पण, तिथे मुस्लिमांनाही लक्ष्य बनवले गेले होते.

‘काश्मीर फाइल्स’च्या माध्यमातून भाजप धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघडवत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती. देशातील सामाजिक सामंजस्य टिकवण्याचा प्रयत्न न करता हा चित्रपट करमुक्त करून भाजपचे नेते लोकांना तो बघण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, अशी टीका पवार यांनी केली. शरद पवार म्हणाले,”मोदी सरकारला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असती तर केंद्राने त्यांचे पुनर्वसन केले असते. पण, हे सरकार मुस्लिमांविरोधात लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करत आहे”.

काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांवरील हल्ल्यांमागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जबाबदार होत्या, असे सांगत पवार म्हणाले की, काश्मीर प्रश्नाला सातत्याने पंडित नेहरूंना जबाबदार धरणे योग्य नाही. काश्मिरी पंडित खोऱ्यांतून बाहेर पडले तेव्हा केंद्रात व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. या सरकारला भाजपने पाठिंबा दिला होता. मुफ्ती महम्मद सईद हे केंद्रीय गृहमंत्री होते, जगमोहन राज्यपाल होते. याच जगमोहन यांनी भाजपच्या तिकिटावर दिल्लीत लोकसभेची निवडणूक लढवली होती, असा शाब्दिक प्रहार पवार यांनी केला. त्यामुळे या चित्रपटातून महाराष्ट्रात पुन्हा राजकारण तापताना दिसत आहे.

Web Title: Ncp leader sharad pawar critisises the kashmir files says there was no need to allow this movie nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2022 | 02:33 PM

Topics:  

  • The Kashmir Files
  • vivek agnihotri

संबंधित बातम्या

‘वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण’, विवेक अग्रिहोत्रीच्या वक्तव्यावरून आता नवा वाद, पल्लवी जोशीही झाली ट्रोल
1

‘वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण’, विवेक अग्रिहोत्रीच्या वक्तव्यावरून आता नवा वाद, पल्लवी जोशीही झाली ट्रोल

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!
2

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

The Bengal Files Trailer रिलीज, भारत, बंगाल आणि कत्तल, प्रत्येक सीन अंगावर शहारे आणणारा
3

The Bengal Files Trailer रिलीज, भारत, बंगाल आणि कत्तल, प्रत्येक सीन अंगावर शहारे आणणारा

कोलकातामध्ये ‘The Bengal Files’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, तणावाचे वातावरण
4

कोलकातामध्ये ‘The Bengal Files’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, तणावाचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.